वांद्रे स्कायवॉकच्या काही भागावर हातोडा; २५ मार्चपासून राहणार बंद

वांद्रे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या पहिल्या स्कायवॉकचा काही भाग हा २५ मार्चपासून नागरिकांसाठी बंद राहणार आहे.

Mumbai
Bandra skywalk
वांद्रे स्कायवॉक

वांद्रे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या पहिल्या स्कायवॉकचा काही भाग हा २५ मार्चपासून नागरिकांसाठी बंद राहणार आहे. बीकेसी कनेक्ट प्रकल्पासाठी हा स्कायवॉक बंद राहील. येत्या २४ जूनपर्यंत हा स्कायवॉक नागरिकांसाठी बंद राहणार आहे. कलानगर वांद्रे येथे एमएमआरडीए मार्फत फ्लायओव्हरचे काम हाती घेण्यात आले आहे. बीकेसी ते वांद्रे दरम्यानच्या फ्लायओव्हरच्या कामासाठी १०० कोटी रूपये प्राधिकरणाने मंजुर केले आहेत.

गर्दी कमी करण्यासाठी नव्या रस्त्याचे नियोजन 

वांद्रे कुर्ला संकुलातील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी दोन फ्लायओव्हर बांधण्याचे कामे एमएमआरडीए मार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १६३ रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही पुलांची लांबी वांद्रे कुर्ला संकुल ते सी लिंक आणि सी लिंक ते वांद्रे कुर्ला संकुल अशी १८८८ मीटर इतकी आहे. धारावी ते सी लिंक या मार्गावर गर्दी कमी व्हावी या उद्देशाने आणखी एक १२ फुट रूंद आणि ३०० मीटर लांबीच्या एका रस्त्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे.

२४ जूनपर्यंत स्कायवॉक बंद 

उड्डाणपूलाच्या कामाच्या आखणीत स्कायवॉकचा काही भाग हा छेदत आहे. त्यामुळेच वांद्रे पूर्व येथील स्कायवॉकचा काही भाग हा बंद ठेवण्यात येणार आहे. फ्लायओव्हरच्या कामाला छेदणारा १०० मीटरचा भाग तोडण्यात येणार आहे. फ्लायओव्हरचे काम पुर्ण झाल्यानंतर हा स्कायवॉकचा भाग पुन्हा बांधॻ्यात येईल. त्यामुळे २४ जूनपर्यंत हा स्कायवॉक बंद राहील. एसआरए कार्यालय इमारतीपासून ते नंदादीप गार्डन पर्यंत येणारा स्कायवॉकचा भाग या दरम्यान बंद राहील. एमएमआरडीएने जाहीर सूचनेद्वारे स्कायवॉक बंद राहणार अशी माहिती जाहीर केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here