घरमुंबईदादरमध्ये बांग्लादेशी कुरिअर बॉयने केला महिलांवर हल्ला

दादरमध्ये बांग्लादेशी कुरिअर बॉयने केला महिलांवर हल्ला

Subscribe

मराठी भाषा येत नसल्याच्या वादातून एका बाग्लादेशा कुरिअर बॉयने दोन महिलांवर हल्ला केला आहे. या महिलांपैकी एक महिला जखमी झाली आहे.

मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून एका कुरिअर बॉयला परत पाठवणाऱ्या महिलांवर कुरिअर बॉयने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या वादातून कुरिअर बॉयने या महिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक महिला जखमी झाले आहे. या घटनेची तक्रार शिवाजी पार्क पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी कुरिअर बॉय बांग्लादेशी असल्याची माहिती समोर आली. मागील महिन्यात हा आरोपी कुरिअर बॉय भारतात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कसा घडला प्रकार

दादर येथील शिवाजी पार्क परिसरात पीडित महिला राहते. आज सकाळी तिच्या घरी हा कुरिअर बॉय आला होता. त्यावेळी या महिलेनी त्याला मराठीत बोलण्यास सांगितले. मात्र मराठी येत नसल्याने महिलेला संक्षय आला तिने त्याला कुरिअर परत नेण्यास सांगितले. त्यावेळी उदभवलेल्या वादातून या तरुणाने महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मध्यस्ती करण्यास आलेल्या महिलेवरही त्याने हल्ला केला. आरडा ओरड झाल्यानंतर येथील स्थानिकांनी या तरुणाला पकडले. तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या तरुणाकडून ओळखपत्र मागितले असता तो बाग्लादेश येथील रहिवासी असल्याचे उघडकीस आले. मागील काही दिवसांपासून तो मुंबईत माहिम परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -