घरमुंबईबीडीडी चाळींचा ९९ वर्षानंतर कायापालट

बीडीडी चाळींचा ९९ वर्षानंतर कायापालट

Subscribe

हवेशीर घरांसाठी प्राधान्याने लॉटरी प्रक्रिया

बीडीडी चाळींच्या पुर्नवसन प्रकल्पातील एन.एम. जोशी मार्ग (लोअर परळ) साठी पहिली लॉटरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निघणार आहे.जवळपास ९९ वर्षे जुन्या बीडीडी चाळींवर अखेर येत्या महिन्याभरात हातोडा पडणार आहे. यानिमित्ताने सध्याचे १६० चौरस फुटातील रहिवासी ५०० चौरस फुटाच्या २ बीएचके घरात रहायला जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत पुर्नवसनासाठी ट्रान्झिट कॅम्पमध्ये शिफ्ट होणार्‍या लाभार्थ्यांना इमारतीत वरच्या मजल्यांवर हवेशीर अशी घरे प्राधान्याने लॉटरीअंतर्गत मिळतील. साधारणपणे दोनवेळा ही लॉटरी काढण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

म्हाडाच्या एन.एम. जोशी येथील बीडीडी चाळींमधील २३२ रहिवासी सध्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. तर २९२ जणांनी या प्रकल्पात पुर्नवसनासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. तर म्हाडाकडून आतापर्यंत ४०० जणांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरीत करण्यासाठीचे पत्र देण्यात आले आहे. एन. एम. जोशी मार्ग (लोअर परळ) याठिकाणी बीडीडीच्या ८ चाळींमधील ८०० जणांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. आतापर्यंत ६०७ जण या प्रक्रियेत पात्र ठरले आहेत. तर उर्वरीत लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे, असे म्हाडातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. बीडीडी पुनर्वसन प्रखल्पात एकूण २२ मजल्याची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामधील एका विंगमध्ये १६० रहिवासी अशी व्यवस्था असणार आहे. प्रत्येकी ५०० चौरस फुटाचे क्षेत्रफळ असलेले २ बीएचके फ्लॅट या लाभार्थ्यांना मिळतील.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकल्पाअंतर्गत ८ चाळीतील ८०० रहिवाशांचे पुनर्वसन हे ७ इमारतींच्या विंगमध्ये करण्यात येणार आहे. सध्या मुंबईतील सहा गिरण्यांच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये या एन.एम.जोशी मार्गावरील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. नजीकच्या एक ते दोन किलोमीटरमध्येच हे ट्रान्झिट कॅम्प बांधण्यात आले आहेत. बीडीडीच्या जागेचा ताबा जितका लवकर मिळेल तितक्या वेगाने या प्रकल्पात नवीन इमारत बांधण्याची सुरूवात होईल. त्यासाठीच म्हाडासोबतचा रहिवाशांचा करार करण्यासाठी पुढाकार स्थानिक पातळीवर व्हायला हवा, असे म्हाडातील एका अधिकार्‍याने सांगितले. सध्या रहिवाशांच्या सोयीसाठी रजिस्ट्रेशन आणि नोंदणीची प्रक्रिया ही सकाळी ८ ते रात्री ८ अशी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

याठिकाणी ट्रान्झिट कॅम्प गिरणी कामगारांच्या सहा मिलच्या जागेवर म्हाडाकडून ट्रान्झिट कॅम्प उभारण्यात आले आहेत. सहा मिलमध्ये सेंच्युरी, भारत, रुबी, वेस्टर्न इंडिया, प्रकाश कॉटन आणि ज्युबिली मिलचा समावेश आहे. मिलच्या जागेत बांधण्यात येणार्‍या ट्रान्झिट कॅम्पपैकी एकूण १ हजार १२७ घरे ही बीडीडीसारख्या प्रकल्पांसाठी म्हाडासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. पुनर्वसन प्रकल्पातील इमारती तयार होण्यासाठी आणखी तीन वर्षे इतका कालावधी अपेक्षित आहे. या प्रकल्पाअंतर्गत उभ्या राहणार्‍या घरांसाठीच रहिवाशांच्या प्रतिसादानुसार लॉटरी काढण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -