Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी डुगॉन्ग दिन विशेष : समुद्री गाय 'डुगॉन्ग' या सस्तन प्राण्यांविषयी संवेदनशील व्हा!

डुगॉन्ग दिन विशेष : समुद्री गाय ‘डुगॉन्ग’ या सस्तन प्राण्यांविषयी संवेदनशील व्हा!

पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त घटक असलेल्या या जीवांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याने आणि सामान्य नागरिकांपर्यंत या प्राण्यांचे महत्व पोहोचावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना व्हायरस ही महामारी पसरली आहे. कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी काही देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनमुळे पर्यावरणातील प्रदूषण मात्र कमी झाले असून याचा फायदा वन्यजीव सृष्टीला झाला आहे. समुद्री गाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डुगॉन्गविषयी लोकांना संवेदनशील बनविण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण उपक्रमात हाती घेतले जात आहेत. या संदर्भात वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट इंडियाने २८ मे रोजी ‘डुगॉन्ग दिना’निमित्त ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त घटक असलेल्या या जीवांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याने आणि सामान्य नागरिकांपर्यंत या प्राण्यांचे महत्व पोहोचावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

डुगॉन्गचे महत्त्व, त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याचे आणि त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता याबद्दल जागरूकता पोहोचविण्याचे उद्दीष्ट आहे. ऑनलाईन स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धा, क्विझ स्पर्धा आणि स्लोगन स्पर्धा घेण्यात आली. भारतीय सागरी सस्तन प्राणी अत्यंत लाजाळू आणि धोक्यात असलेल्या सागरी सस्तन प्राण्यांविषयी मोठ्या संख्येने संवेदनशील होण्याची गरज आहे. डुगॉन्ग हा समुद्रातील एकमेव सस्तन प्राणी आहे. तो फक्त समुद्रातील गवत खातो. आता ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तामिळनाडू, अंदमान-निकोबार आणि गुजरात या तीन राज्यात ही प्रजाती आढळून येते. संस्थेने या प्रजातीचे जतन आणि संवर्धनाचा पुढाकार घेतला आहे.

संस्था अशी काम करते

- Advertisement -

देहरादूनस्थित संस्था २०१६ पासून गुजरात, तामिळनाडू आणि अंदमान बेटांवर भारतातील डुगॉन्गच्या संवर्धनाचे काम करत आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून सामान्यांना डुगॉन्ग या प्राण्यांविषयी जागरूक केले जात आहे. ही संस्था वन विभाग, सरकारी शाळा, पर्यटन संबंधित संस्था आणि मच्छीमार अशा अन्य सहभागी घटकांसोबत हा उपक्रम राबवितात.

- Advertisement -