घरमुंबईबेस्ट चालक-वाहकाला मारहाण

बेस्ट चालक-वाहकाला मारहाण

Subscribe

दोन आरोपींना सहा महिन्यांची शिक्षा

नवी मुंबईच्या नेरुळ परिसरात असलेल्या हॉटेलच्या मॅनेजरने बेस्टच्या वाहक-चालकाला केलेल्या मारहाण आणि धमकी प्रकरणी साक्षी आणि पुराव्यांच्या आधारावर ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेंद्र तांबे यांनी दोन आरोपींना दोषी ठरवून त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि 20 हजारांचा प्रत्येकी दंड ठोठावला.

या खटल्यात बेस्ट बसचे चालक मेहबूब शेख घाटकोपर ते नेरुळ डेपो या बसवर कार्यरत होते. 28 फेब्रुवारी 2015 रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आरोपी बाईकसह बससमोर आले. त्यांनी शेख आणि वाहक संदीप एरंडे यांना शिवीगाळ करीत मारहाण करीत बस पेटवून देण्याची धमकी दिली. त्या घटनेनंतर बस चालक शेख आणि वाहक एरंडे यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नेरूळ पोलिसांनी आरोपी शरद शेट्टी (30) आणि रमेश शेट्टी(42) यांना अटक केली. हे दोघेही नवी मुंबईत एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. हे प्रकरण ठाणे जिल्हा न्यायालयात दाखल झाल्यावर त्याच अंतिम सुनावणी सुरू होती. सरकारी वकील संध्या जाधव यांनी न्यायालयात गुन्ह्या संबंधी सर्व साक्षी आणि सबळ पुरावे सादर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -