हिवाळी सत्र परीक्षाचे अर्ज भरण्यास सुरुवात

महाविद्यालयाने परीक्षा अर्ज ऑनलाईन भरण्याची व ते फॉर्म विद्यापीठात दाखल करण्याची तारीख ११ ते २८ नोव्हेंबरपर्यंत करणार आहेत. विद्यार्थ्यांना १ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क भरता येणार आहे.

mumbai university
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे अनेक महत्वाचे निकाल जाहीर झाले आहेत. यानुसार मुंबई विद्यापीठाने २०२० मध्ये व्दितीय (हिवाळी) सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयाने परीक्षा अर्ज ऑनलाईन भरण्याची व ते फॉर्म विद्यापीठात दाखल करण्याची तारीख ११ ते २८ नोव्हेंबरपर्यंत करणार आहेत. विद्यार्थ्यांना १ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविद्यालयांनी संबधित विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, नाव, माध्यम, परीक्षा केंद्र, विषय व दिव्यांग इत्यादी बाबी बरोबर आहेत, याची खात्री करून घ्यावी. ही माहिती गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रासाठी वापरण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा अर्ज विद्यापीठात दाखल झाल्यावर वरील कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.

ऑनलाईन परीक्षा अर्ज विद्यापीठात दाखल करण्यापूर्वी महाविद्यालयाच्या लॉगिनमधून परीक्षेचे विषय बदल करता येतील. परीक्षा अर्ज विद्यापीठात ऑनलाईन दाखल झाल्यानंतर परीक्षेच्या विषयामध्ये बदल करायचा असल्यास प्रति विषय रुपये ५० रुपये या प्रमाणे दंड आकारण्यात येईल. महाविद्यालयांनी हिवाळी सत्रासाठी परीक्षा अर्ज नमूद तारखेत भरून देणे आवश्यक आहे. यानुसार लवकरच हिवाळी परीक्षेचे परिपत्रक जाहीर करण्यात येईल.