घरCORONA UPDATEबेस्ट प्रशासन कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लपवते- शशांक राव 

बेस्ट प्रशासन कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लपवते- शशांक राव 

Subscribe

आजमितीस ३५० पेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी कोरोनाची लागण झालेली असून जवळपास ७०० पेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी विलगिकरणात आहेत.

कोविड -१९ या महामारीमुळे बाधित बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आजमितीस ३५० पेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी कोरोनाची लागण झालेली असून जवळपास ७०० पेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी विलगिकरणात आहेत. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढायांमध्ये लढाईमध्ये कोरोना योद्ध्यांना प्रवासी वाहतुकीची सेवा देताना आणि सर्वसामान्य जनतेला वीजपुरवठ्याची सेवा देताना ४९ कर्मचारी-अधिकारी कोरोनामुळे शहीद झाले आहे. दुर्दैवाने बेस्ट उपक्रम ही माहिती लपवत असल्याचा आरोप दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनकडून करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बेस्ट कर्मचाऱ्यांकरिता स्वतंत्र रुग्णालय आणि विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने स्वतःच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय व विलगीकरण कक्ष मुंबई महानगरपालिकेकडून निश्चित करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दुर्दैवाने यामागणी संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात अपयशी ठरलेला आरोप दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन सरचिटणीस शशांक राव यांनी केला आहे. बेस्ट उपक्रमाच्या कर्मचारी अधिकार्‍यांसाठी शासनाच्या परवानगीने तांत्रिक प्रशिक्षण केंद्र वडाळा आगार व वाहतूक प्रशिक्षण केंद्र दिंडोशी येथे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय व विलिनीकरण कक्ष तयार करण्यात यावे, तसेच रुग्णालयाची मुख्य जबाबदारी बेस्ट उपक्रमाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिलकुमार सिंगल यांना देऊन त्यांच्या व्यतिरिक्त बेस्ट उपक्रमाच्या सेवेत असलेल्या ३१ वैद्यकीय अधिकाऱ्यांना तेथे सेवा देण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी सुद्धा शशांक राव यांनी केली आहेत.

- Advertisement -

कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांना घ्या

रुग्णालयात व विलगीकरण कक्षासाठी नर्सिंग व पॅरामेडिकल सेवेकरी तात्पुरती/ अस्थायी पदे निर्माण करून किंवा कंत्राटी पद्धतीने परिचारिका व वैद्यकीय तांत्रिक कर्मचारी भरती करण्यात यावी किंवा कंत्राटी पद्धतीने या सेवा उपलब्ध करून देण्यात याव्या, याच केंद्रावर बेस्ट कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी कोविड-१९ संदर्भात चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी युनियनकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परिपत्रकाद्वारे केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -