घरमुंबईबेस्टचे कंडक्टर मागताहेत पोलिस संरक्षण, कारण ठरतेय चिल्लर

बेस्टचे कंडक्टर मागताहेत पोलिस संरक्षण, कारण ठरतेय चिल्लर

Subscribe

बेस्ट उपक्रमाच्या विनावाहक बसगाड्यामध्ये प्रवाशांची तिकीट देण्यासाठी अनेक बेस्टच्या थांब्यावर कंडक्टरची नेमणूक करण्यात आली. मात्र त्यांना कसलीही सुरक्षा बेस्टकडून देण्यात आली नाही. परिणामी आज बस थांब्यावरुन बस कंडक्टरांच्या पैशांच्या बॅगा चोरी जात असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. त्यामुळे बेस्टच्या कंडक्टरमध्ये चिल्लर चोरांची दहशत निर्मान झालेली आहे. जांभूळ पाडा बस स्टॉप आणि चकाला सिगरेट फॅक्टरी स्टॉपवर कंडक्टरच्या बॅगा चोरी गेल्या असून यांसंबधीत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहे.

अ‍ॅनलॉकची सुरुवात झाल्याने बेस्टकडून दररोज ३ हजार २२४ बसगाड्या चालवल्या जात आहे. ज्यात बेस्टच्या ६०० पेक्षा जास्त वातानुकूलित मिनी बसगाड्या धावत आहेत. याबसगाड्यामधून विनावाहक पॉइंट टू पॉइट सेवा दिली जाते. प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी ठराविक स्टॉपवर कंडक्टरची नेमणूक करण्यात येते. मात्र बस स्टॉपवर कर्तव्यांवर असलेल्या बेस्ट कंडक्टरांचे पैशांच्या बॅग चोरी जात असल्याची घटना समोर येत आहे.

- Advertisement -

15 सप्टेंबर 2020 रोजी मरोळ डेपोचे कंडक्टर रामशंकर यादव हे चकाला सिगरेट फॅक्टरी जवळच्या या बस स्टॉपवर ग्राउंड बुकिंग करत होते. यांच दिवशी त्यांना बेस्टकडून वेतन सुध्दा मिळाले होते. मात्र हे वेतन पाच, दहा रुपयांची नाणी आणि शंभरच्या आतील मुल्यांच्या नोटा अशी 13 हजार 500 रुपयांची चिल्लर रक्कम घेऊन रामशंकर कर्तव्यावर आले होते. मात्र पैशांच्या भार जास्त असल्याने त्यांनी आपली बॅग बस स्टॉपवर ठेवली आणि तिकीट मशीन घेउन प्रवाशांच्या तिकीटा काढायला लागले. मात्र यात त्यांची पैशाची बॅग चोरांनी लपास केली. संपुर्ण महिन्याचे वेतन, औळखपत्र आणि महत्वपुर्ण कागदे सुध्दा या बॅगबरोबर चोरीला गेले आहेत.

दुसऱ्या घटनेत 8 ऑगस्ट 2020 रोजी घडली, मरोळ डेपोचे कंडक्टर  रमेश राठोड हे जांभूळ पाळाच्या बस स्टॉपवर ग्राउंड बुकिंग करत होते. प्रवाशांची तिकीट काढत असताना पाण्याची बॉटल आणि बॅग बस स्टॉपवर ठेवली होती. मात्र चोरानी त्यांची बॅग पळवली.  याबॅगेत 4 हजार 100 रुपयांचे बेस्ट तिकीट होत्या. तसेच एटीएम, पॉकेट इतर कागदपत्रे होती. त्यानंतर रमेशने याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

बेस्ट कंडक्टरांना सुरक्षा द्या

कोरोनाच्या संकटकाळात बेस्टचे कर्मचारी अथक मेहनत घेत आहे. पण या कर्मचार्‍यांनाच आता बेस्टनेच ररत्यावर आणले आहे. खासगी कंत्राटदाराकडून घेतलेल्या मिनी बसमधील प्रवाशांची तिकिटे फाडण्यासाठी कंडक्टरना कोणत्याही सुविधेशिवाय थेट रस्त्यावरच उन्हा-पावसात उभे केले आहे. त्यामुळे लंघुशंकेसाठी थांबा सोडून एका चौकातून दुसर्‍या चौकात जावे लागते.तसेच गर्दीच्या बसेसमध्ये सुध्दा बॅग आणि तिकीट मशीन घेउुन प्रवेश करने कठीण आहे. त्यामुळे बॅग बस स्टॉपवर ठेवतो. मात्र गेल्या काही दिवसापासून आमच्या बॅग चोरीच्या वांरवांर घटना समोर येत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने आम्हा सुरक्षा द्यावीत.

बेस्टच्या कंडक्टरांना बस स्टॉपवर ग्राउड बुकिंगसाठी उभे करुन, त्यांच्या सेवाशर्तीचे उल्लंघन करते आहे. त्यांच्या सुरक्षेची कसलीही गॅरेटी नाही. याला बेस्टचे वरिष्ठ अधिकारी दोषी आहे. बेस्ट प्रशासनाने तात्काळ या कंडक्टरांना सुरक्षा देण्यात यावी.

- Advertisement -

जगणारायन कहार

सरचिटणीस, बेस्ट कामगार संघटना 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -