घरताज्या घडामोडीबेस्टच्या ८१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; ६०० जण विलगीकरण कक्षेत

बेस्टच्या ८१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; ६०० जण विलगीकरण कक्षेत

Subscribe

बेस्टच्या ८१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून तब्बल ६०० जणांना विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आता हा आकडा २३ हजार ४०१ जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, या कोरोनावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासन, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तर या सर्वांना ने – आण करण्यासाठी बेस्ट कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाने वेढले आहे. मुंबईसह इतर ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्टमधील ८१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

७० टक्के चालक आणि वाहकांचा समावेश

बेस्टमधील लागण झालेल्यांपैकी ७० टक्के जणांनामध्ये चालक आणि वाहकांचा समावेश आहे. तर उर्वरित कर्मचारी हे तांत्रिक आणि विद्युत विभागातील आहेत. या सर्वांना घरातच वेगळे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

दीड हजार बसगाड्या धावतात

सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहेत. दरम्यान, रिक्षा, टॅक्सी, ओला, रेल्वे बंद असल्यामुळे याचा भार बेस्टवर आला आहे. त्यामुळे दररोज १ हजार ५०० बसगाड्या धावत आहेत. त्यामुळे तीन हजारपेक्षा जास्त चालक – वाहक आपले कर्तव्य बजावत आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक निरिक्षक आणि परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत.

तरीही होते कोरोनाची लागण

दररोज मास्क, सॅनिटाझरचा वापर करुन कर्मचाऱ्यांना तपासणी करुन त्यांना आगरात सोडले जाते. मात्र, असे असून देखील कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने कोरोनाची लागण होत आहे. आता जवळपास ६०० हून जास्त कर्मचारी घरातच विलगीकरणात राहत आहे, असे बेस्ट उपक्रमाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार सिंगल यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

गेल्या १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी कामावर परतले आहेत. पण, यादरम्यान इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा नव्याने काहींचे विलगीकरण करावे लागले आहे. यामध्ये सध्या ५५ पेक्षा जास्त वय असलेले कर्मचारी, अपंग कर्मचाऱ्यांसह उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या दीड हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – लवकरच पाऊस मुंबईत धडकणार; हवामान खात्याचा अंदाज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -