घरCORONA UPDATEकोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टमध्ये नोकरी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टमध्ये नोकरी

Subscribe

बेस्टमध्ये कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. आतापर्यंत एकूण कोरोनागस्त कर्मचाऱ्यांची संख्या १०८ झाली आहे. तर यात ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी आतापर्यंत चार मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना उपक्रमाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे. उर्वरित व्यक्तींच्या नातेवाईकांना लवकरच उपक्रमात या सेवेत दाखल करून घेण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. बेस्ट उपक्रमातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. त्यातील ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून तर ४२ कर्मचारी कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलिस, डॉक्टर, नर्स, मंत्रालय, महापालिका कर्मचाऱ्यांच्या ने-आण करण्यासाठी बेस्टच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. बेस्टचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहे.

- Advertisement -
best nokari
नोकरीबाबतचे पत्र

मात्र कोविड-१९ दरम्यान सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या सर्व सुविधा पुरवण्याचे बेस्ट उपक्रमाचे प्रयत्न आहेत. अर्थात अशा उपाययोजना करूनही काही कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे. ही दुर्दैवी बाब असून कोविड -१९ कालावधीत उपक्रमाची सेवा बजावताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत सामावून घेऊन, त्यांना कायमस्वरूपी आर्थिक आधार देण्यात येत आहे. आतापर्यंत चार मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना उपक्रमाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे. उर्वरित व्यक्तींच्या नातेवाईकांना लवकरच उपक्रमात या सेवेत दाखल करून घेण्यात येईल अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दैनिक आपलं महानगरला दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -