घरमुंबईबेस्ट कर्मचार्‍यांची दिवाळी गोड जाणार; ९ हजार १०० रूपये बोनस मिळणार

बेस्ट कर्मचार्‍यांची दिवाळी गोड जाणार; ९ हजार १०० रूपये बोनस मिळणार

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या बेस्ट कामगारांसाठी यंदाची दिवाळी गोड जाणार आहे. यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांना ९ हजार १०० रुपये इतका बोनस मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या बेस्ट कामगारांसाठी यंदाची दिवाळी गोड जाणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा कोणत्याही संघर्षाशिवाय बोनस मिळणार आहे. बेस्ट प्रशासनाने कामगारांना ९ हजार १०० रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच बेस्ट समितीची मंजुरी घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

९ हजार १०० रुपये बोनस

वेतन करार आणि प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी येत्या ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारणार असून त्यांनी यासंदर्भात नोटीसही बेस्ट उपक्रमाला दिली आहे. बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील सुरु असलेल्या वाद टोकाला जात असताना. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ९ हजार १०० रुपये इतका बोनस बेस्ट प्रशासनाने जाहीर केला आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दसर्‍यापूर्वीच हा बोनस हातात पडल्यास ते दसर्‍यापूर्वीच दिवाळी साजरी करू शकणार आहेत. या बोनसमुळे उपक्रमावर ३३ कोटी ३६ लाख रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. यांसंबधीत तसा प्रस्ताव सुध्दा बेस्ट प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्तावर आगामी बेस्ट समिती सभेत मांडण्यात येणार असून समितीची मंजूरी मिळल्यास हा प्रस्तावर मुंबई महानगर पालिकाकडे जाणार आहे. मात्र, या बोनसचा निर्णय जाहीर झाल्यानंतरही बेस्ट कर्मचार्‍यांची संपाविषयी जी भूमिका ठाम राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरपासून बेमूदत संपावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -