घरताज्या घडामोडीबेस्ट सुसाट; मिळवला एका दिवसात ८३ लाखांहून अधिक महसूल

बेस्ट सुसाट; मिळवला एका दिवसात ८३ लाखांहून अधिक महसूल

Subscribe

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित लाेकल प्रवास सुरू केल्यानंतर बेस्ट उपक्रमाने आपली विशेष बससेवा बंद केली आहे. त्यामुळे आता बेस्टच्या फेऱ्या वाढल्याने प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी तब्बल ८ लाख ९५ हजार ५८८ प्रवाशांची बेस्टमधून प्रवास केला आहे. यामुळे बेस्टला ८३ लाख ९६ हजार ६४८ रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात बेस्ट सुसाट धावत आहे.

बेस्ट उपक्रमातर्फे काेराेनाचा संसर्ग पसरू नये याकरिता झटणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यापासून विशेष बसफेऱ्या सुरू केल्या. मुंबईसह इतर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बस फेऱ्या चालविल्या जात होत्या. उपक्रमाने काही दिवसापूर्वी त्या सेवा अचानक खंडित करण्याचा निर्णय घेतला. लाेकलची वाहतूक सुरू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी ज्यांना लाेकलमध्ये प्रवासास मुभा नाही, त्या कर्मचाऱ्यांची कुचंबणा हाेत आहे. उपक्रमाने अत्यावश्यक सेवेसाठी सुरू केलेले अतिरिक्त मार्ग बंद केल्याने इतर प्रवाशांसाठी बसच्या अधिक फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे बसप्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यात आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही तिकीट घेणे बंधनकारक झाल्याने महसुलात वाढ झाली असे बेस्टकडून सांगण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवांसाठी चालविण्यात येणाऱ्या फेऱ्यांची संख्या दैनंदिन स्तरावर साधारण १८०० पर्यंत होती. ती संख्या आता २,९२६ पर्यंत पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात बेस्टच्या बसेसमधून ८ लाख ९५ हजार ५८८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ज्यांच्यामाध्यमातून बेस्टला ८३ लाख ९६ हजार ६४८ रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात बेस्टचे अच्छे दिन आले असे म्हणावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -