विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

BEST mini bus accident near Vikhroli bridge
विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात झाल्याचे समोर येत आहे. भांडूप येथून वरळीकडे ही बस निघाली होती. माहितीनुसार या बसमध्ये २० ते २२ प्रवासी होते. यापैकी १० ते १५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. सध्या या घटनास्थळी विक्रोळी पोलीस पोहोचले असून या अपघाताची आधीच चौकशी केली जात आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)