बेस्ट आगारांमधील मोठ्या वाहनांचे पार्किंग स्वस्त, नव्या दराला मान्यता

किमान तिकीटदर कमी केल्यानंतर आता बेस्टने आगारामध्ये असलेल्या मोठ्या पार्किंगचे दर देखील कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai
Best Depot Parking
बेस्ट आगार

तोट्यातील बेस्ट उपक्रमाला महापालिकेने काटकसरीच्या उपाययोजनांच्या शिफारशी सुचवल्या असून त्यांची अंमलबजावणी बेस्ट कडून केली जात आहे. बेस्टच्या प्रवाशांना किमान ५ रुपयांमध्ये आणि वातानुकुलित प्रवाशांना किमान ६ रुपयांमध्ये तिकीट दर उपलब्ध करून दिल्यानंतर आता बेस्टने आपल्या आगारातील खासगी वाहनांसाठी पार्किंगचे दर निश्चित केले आहे. हे पार्किंगचे दर कमी असून याला बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय मोठ्या वाहनचालकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.

पालिकेच्या सूचनेनुसार नवे धोरण

मुंबईच्या रस्त्यांवर बससह मोठी वाहने उभी रहात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्टच्या वतीने वाहनतळ धोरण राबवले जावे, अशी सूचना महापालिकेने केली होती. त्यानुसार बस आगारांत खासगी वाहनांसाठी उपलब्ध होणाऱ्या पार्किंग सुविधेचेही दर कमी करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी बेस्ट समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.


हेही वाचा – बेस्टच्या भाडेकपातीचा टॅक्सी-रिक्षांना फटका

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी फायदा

मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरणा’च्या माध्यमातून वाहन पार्किंगसाठी अधिकाधिक जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’, ’पे अ‍ॅन्ड पार्क’ योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रमास आताचे पार्किंग दर कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरणा’ने केलेल्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी बेस्ट बस आगारातील पार्किंगचे दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे बेस्ट परिवहन विभागातील अधिकार्‍याने बेस्ट समितीत सांगितले. त्यानंतर बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

कसे आहेत नवे दर?

दुचाकी : ३ तासांसाठी २० रु., ६ तास २५ रु., १२ तास ३० रु., १२ तासांहून अधिक ३५ रु.
तीन व चार चाकी : ३ तासांसाठी ३० रु., ६ तास २५ रु., १२ तास ७० रु., १२ तासांहून अधिक ८० रु.
रिक्षा-टॅक्सी : ३ तासांसाठी ३० रु., ६ तास ४० रु., १२ तास ७० रु., १२ तासांहून अधिक ८० रु.,
ट्रक – टेम्पो : ३ तासांसाठी ५५ रु., ६ तास ९० रु., १२ तास १६५ रु.
बस : ३ तासांसाठी ६० रु., ६ तास ९५ रु., १२ तास १७५ रु.

मासिक पास

दुचाकी : १२ तासाचे ६६० रु., २४ तासांचे १३२० रु.
तीन व चार चाकी : १२ तासाचे १,५४० रु., २४ तासांचे ३,०८० रु.
रिक्षा – टॅक्सी : १२ तासाचे १,५४० रु., २४ तासांचे ३,०८० रु.
ट्रक – टेम्पो : १२ तासाचे ३,६३० रु., २४ तासांचे ७,२६० रु.
बस : १२ तासाचे २००० रु., २४ तासांचे ३,७०० रु.


हेही वाचा – मुंबईकर पुन्हा कचाट्यात; बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here