घरमुंबईचिल्लरचे ओझे बेस्ट वाहकांच्या खिशांवर...

चिल्लरचे ओझे बेस्ट वाहकांच्या खिशांवर…

Subscribe

वाहकांचे खिसे होऊ लागले टर -टर

बेस्ट प्रशासनाने ऐतिहासिक भाडेकपात करुन मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र या भाडेकपातीमुळे बेस्टमध्ये परिवर्तनाचे वारे आता वाहू लागले आहेत. पूर्वी सुट्टया पैशांवरुन प्रवासी आणि बेस्ट वाहकांमध्ये मारामार्‍या आणि वाद निर्माण होत होते. मात्र जेव्हापासून बेस्टने भाडेकपात केली,तेव्हापासून मुंबईकर घरातूनच सुट्टे पैसे घेऊन बाहेर पडत आहेत. त्यामुळे बेस्टच्या वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत नाही. मात्र बेस्टमध्ये सुट्टया पैशांची आवक तीन पट वाढल्याने बेस्टच्या वाहकांचे खांदे मात्र चिल्लरच्या वजनाने वाकत आहेत.

बेस्टने 9 जुलैपासून दरकपात केल्याने साध्या बसचे किमान तिकीट पाच रुपये तर एसी बसचे सहा रुपये तिकीट झाल्याने मुंबईकरांनी बेस्टच्या स्वस्त आणि मस्त प्रवासाला भरघोस प्रतिसाद दिला आहे. बेस्टच्या प्रवाशांच्या संख्येत सात लाखांनी वाढ झाली आहे. परंतु, प्रवाशांमध्ये आणि वाहकांमध्ये वारंवार सुट्ट्या पैशांवरून खटके उडणे नवल नाही. परिणामी, याचे रुपांतर मोठ्या वादात सुध्दा होत होते. वाहकांच्या तक्रारी बेस्टकडे मोठ्या प्रमाणात येत होत्या. परंतु,जेव्हापासून बेस्टने भाडेकपात केली. तेव्हापासून प्रवासी सुध्दा सुट्टे पैसे बाळगताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता वाहकांना सुट्टे पेैसे मागण्याची वेळ येत नाही. उलट प्रवासी सुट्टे पैसे देत आहेत.

- Advertisement -

खिशांवर चिल्लरचा भार

बेस्टच्या ताफ्यात ३,३३७ बसगाड्या आहेत.ज्यामध्ये जवळपास १० हजार कंडक्टर असून त्यांना ड्युटीवर जाण्यापूर्वी प्रशासनातर्फे प्रत्येकी १०० रुपयांची नाणी दिली जातात. त्यामध्ये १ रु., २ रु., ५ रु. आणि १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश असतो.पुर्वी ही नाणी लवकर संपायची. मात्र भाडेकपातीमुळे आत चार पटीने उलट चिल्लर येऊ लागली आहेत. त्यामुळे वाहकांना एवढ्या मोठया प्रमाणात 5 रुपयांची नाणी सांभाळणे कठीण झाले आहे.

पुर्वी प्रवांशाकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे अनेक समस्या होत्या. अनेकदा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद व्हायचा मात्र आता प्रवासीच सुट्टे पैसे देतात. सोबतच बेस्टने भाडेकपात केल्यामुळे अभिनंदन सुध्दा करत आहेत.          – दादासाहेब जाधव, बस निरीक्षक,बेस्ट

- Advertisement -

बेस्टने भाडेकपात केली. तेव्हा आम्हाला वाटत होत की, सुट्ट्या पैशांच्या टंचाईला सामोर जावे लागेल. मात्र प्रवासी आता जागृत झाले आहेत. वाहकांची अडचण समजून, तो प्रवासादरम्यान सुट्टे पैसे ठेवतो आहे. -विठ्ठल हळदणकर , बेस्ट, वाहक

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -