घरमुंबईबेस्टच्या निवृत्त कर्मचार्‍यांना थकबाकी मिळेना !

बेस्टच्या निवृत्त कर्मचार्‍यांना थकबाकी मिळेना !

Subscribe

जुन्या करारातील २५ कोटी बाकी, तरीही नव्याची तयारी !

बेस्टने गेल्या पाच वर्षापासून साडेतीन हजारांहून अधिक निवृत्त कर्मचार्‍यांची जुन्या वेतन करारातील २५ कोटी थकबाकी रक्कम अद्यापही दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे साडेतीन हजारांहून अधिक निवृत्त कर्मचार्‍यांना बेस्टच्या मुख्यालयात पायपीट करावी लागत आहे. मात्र बेस्ट प्रशासन जुना वेतन करार विसरून नवा वेतन करार करायला निघले आहे. आपली उमेदीची वर्षे बेस्टच्या सेवेत घालविल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी विविध आजारांनी घेरलेल्या निवृत्त बेस्ट कर्मचार्‍यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. मात्र बेस्टचा कारभार पुढचे पाठ आणि मागचे सपाट असाच दिसून येत आहे.

बेस्ट उपक्रमाला जगविण्यासाठी मुंबई महानगर पालिकाने मदतीच्या हात जरी पुढे केला असला, तरी बेस्टला अनेक प्रश्न भेडसावत आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक बेस्ट कर्मचार्‍यांच्या वेतन करारा संबंधित करार आहे. बेस्टने नवीन वेतन करारावर काही चर्चा न केल्यामुळे नुकतीच बेस्ट कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिली होती. मात्र बेस्टने आश्वासन दिल्यानंतर हा तूर्तास संप मागे घेण्यात आला आहे. मात्र नवीन वेतन कराराच्या अगोदर २०१२ ला बेस्ट कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत बेस्ट प्रशासनाचा कामगार संघटनांबरोबर वेतन करार करण्यात आला होता.

- Advertisement -

तत्पूर्वी त्यासाठी बेस्ट समितीची रीतसर परवानगीही घेण्यात आली होती. या करारानुसार परिवहन विभागातील कर्मचार्‍यांना १ एप्रिल २००६ पासून, विद्युतपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना १ एप्रिल २००९ पासून, तर ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणी अधिकार्‍यांना १ एप्रिल २०११ पासूनची थकबाकी टप्प्याटप्प्याने देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र बेस्ट कर्मचार्‍यांच्या निवृत्तीनंतरही आता पाच वर्षे उलटूनही वेतन कराराची थकबाकीची रक्कम पदरात न पडल्यामुळे निवृत्त कर्मचार्‍यांना म्हातारपणात त्यासाठी झगडावे लागत आहे.

२५ कोटीची आहे थकबाकी
जुन्या वेतन करारातील एकूण कर्मचारी 3 हजार ७६७ निवृत्त कर्मचार्‍यांची आहेत. वेतन करारातील 25 कोटी 51 लाख 1 हजार 239 रुपये इतके थकाबकी अद्यापही मिळालेली नाही. मात्र यासबंधी बेस्टच्या निवृत्त कर्मचारी यांनी अनेकदा बेस्टला पत्रव्यहार केला. मात्र अद्यापही निवृत्त बेस्ट कर्मचार्‍यांच्या हक्काचे पैसे देण्याबाबत बेस्ट उपक्रम मूग गिळून गप्प आहे. बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी बेस्टच्या कारभारासमोर हतबल झाले आहे.

- Advertisement -

बेस्टमधून निवृत्त होऊन मला ५ वर्षे झाली आहेत. मात्र जुन्या वेतन करारातील थकबाकी अद्यापही मिळाली नाही. गेली पाच वर्षे मी बेस्ट समिती आणि बेस्ट प्रशासन यांना पत्रे पाठवित आहे. मात्र अद्यापही यावर कसलीही कारवाई होत नाही. मात्र नवीन वेतन कराराची बेस्ट तयारी करत आहे. बेस्टने सर्वप्रथम जुन्या वेतन कराराची थकबाकी द्यावीत.
-श्याम कदम, निवृत्त बेस्ट कर्मचारी

बेस्ट प्रशासनाबरोबर झालेल्या साम्राज्य करारामध्ये जुन्या वेतन करारातील थकबाकी रकमेचा विषय आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत निवृत्त बेस्ट कर्मचार्‍यांना १० टप्प्यात थकबाकी देण्याचे नियोजन आहे. लवकरच बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना थकबाकीची रक्कम मिळेल.
– अनिल पाटणकर, अध्यक्ष, बेस्ट समिती

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -