घरमुंबईबेस्टच्या संपाचा चौथा दिवस; संपामुळे बेस्टचे ९ कोटींचे नुकसान

बेस्टच्या संपाचा चौथा दिवस; संपामुळे बेस्टचे ९ कोटींचे नुकसान

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. या संपामुळे आता पर्यंत ९ कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तसेच या संपात बेस्ट विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी देखील उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बसच्या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले आहेत. अद्यापही बेस्टचा संप सुरूच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा बेमुदत संप असल्यामुळे चौथ्या दिवशी देखील मुंबईतील सर्व डेपोंमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना सलग चौथ्या दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. मात्र या संपामुळे बेस्टचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेस्टचं आतापर्यंत ९ कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

९ कोटींचे नुकसान

बेस्ट कर्मचाऱ्यांनी केलेल्या तीन दिवसांच्या संपामुळे बेस्टचे अंदाजे ९ कोटी रुपयांहून जास्त नुकसान झाले आहे. मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने आजही हा संप कायम राहणार आहे.

- Advertisement -

बेस्टच्या विद्युत विभागाची संपात उडी

बेस्टच्या विद्युत विभागातील कर्मचारी देखील आता या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात उडी मारणार आहेत. बेस्टच्या विद्युत विभागातील तब्बल ६ हजार कर्मचारी आजपासून संपात सहभागी होणार असल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार आहे.

संपामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांकडून लूट

संपामुळे मोठ्या प्रमाणात फायदा घेतला आहे तो रिक्षा, टॅक्सी चालकांनी. रिक्षा, चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांकडून लूट होत असल्याने मुंबईकरांना पायपीट करावी लागत आहे. यामुळे मुंबईकरांना वेठीस धरले जात आहे.

- Advertisement -

सात तास चर्चा होऊन देखील तोडगा नाही

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सात तासांची चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेनंतर ही तोडगा निघालेला नाही. इतकेच नव्हे, तर संपात तोडगा निघाला नाही तर शनिवारपासून सफाई कामगार आणि रुग्णालय कर्मचारीही संपात उतरणार असल्याने मुंबईकरांचे आणखी हाल होणार असल्याचे दिसून येत आहे.


वाचा – बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त, पण संप अयोग्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -