घरमुंबईबेस्ट संपाचा सलग सातवा दिवस; आज बस धावणार?

बेस्ट संपाचा सलग सातवा दिवस; आज बस धावणार?

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप सातव्या दिवशीही सुरुच आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयात संपाबाबत होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आज तरी बस धावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील सहा दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. या संपाबाबत राज्य सरकारची भूमिकाही अधांतरीच असल्याचे दिसत आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट बसच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले आहेत. अद्यापही बेस्टचा संप सुरूच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा बेमुदत संप असल्यामुळे सातव्या दिवशी देखील मुंबईतील सर्व डेपोंमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना सलग सातव्या दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयात संपाबाबत होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आज तरी बस धावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बेस्टचा प्रदीर्घ संप

बेस्टचा संप चिघळल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचे हाल होत आहेत. संप चिघळल्याने मिरारोड – भाईंदर, ठाणे, नवी मुंबईपर्यंत जाणारी बससेवा पूर्णपणे थांबली. यामुळे मुंबईकर भरडला जात आहे. दोन वर्षांपूर्वी बेस्ट, एसटी कर्मचारी संघाकडून संप पुकारण्यात आले होते. मात्र त्यांचा कालावधी आत्ताच्या संपाच्या कालावधीएवढा नव्हता. त्यामुळे बेस्टचा हा प्रदीर्घ संप ठरला आहे.

- Advertisement -

२५ ते ३० लाख बस प्रवाशांचे हाल

मुंबईतील २५ ते ३० लाख मुंबईकर दररोज बसने प्रवास करतात. मात्र गेल्या सात दिवसांपासून बससेवा बंद असल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. यामध्ये मुंबईकर भरडला जात आहे. मात्र प्रवाशांची उडणारी दैना दुर्लक्षित केली जात असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.

संपावर आज उच्च न्यायालयात सुनावणी

कर्मचारी संपासंबंधात शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने याप्रश्नी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नेमून, त्याआधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीदरम्यान झालेल्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसल्याने सोमवारी या याचिकेवरील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisement -

चार चालक आगारात आले

बेमुदत संप सुरु असल्याने रविवारी केवळ चार चालक आगारात आले होते. पण एकही बस मात्र रस्त्यावर येऊ शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -