घरमुंबईबेस्टचं ट्विटर अकाऊंट सुस्साट, पण..

बेस्टचं ट्विटर अकाऊंट सुस्साट, पण..

Subscribe

आठ दिवसांत चार हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स

सध्या सोशल मीडियाची चलती असून निरनिराळ्या समस्या सोडवण्यासाठी, आपली भूमिका मांडण्यासाठी अनेक खासगी तसेच सरकारी प्रशासन सोशल मीडियाचा आधार घेत असतात. ट्वीटर हे देखील सोशल मीडियावरील एक प्रभावी माध्यम असून आता बेस्ट प्रशासनाने देखील ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांशी संपर्क ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या या निर्णयाला मुंबईकरांकडून तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण गेल्या आठ दिवसांपासून बेस्टच्या बेस्ट इलेक्ट्रीक आणि बेस्ट ट्रान्सपोर्ट या दोन्ही अकाऊंटला मिळून ४ हजार ५०० पेक्षा फॉलअर्स लाभले आहेत. तसेच प्रत्येक दिवसाला 600 नव्या लोकांची यात भर पडत आहे.परंतु, बेस्टच्या प्रवाशांच्या समस्या ऑनलाइन नोंदवून तातडीने सोडविण्यासाठी बेस्टने अद्यापहीअधिकृत व्यक्ती नेमलेला नाही. त्यामुळे हा बेस्टचा हा सोशल पर्याय कितपत प्रभावी ठरतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

खासगी एजन्सी सोशल भार वाहणार
बेस्टच्या बस प्रवांशाना आपत्कालीन परिस्थितीत जादा बसगाड्या तसेच अन्य सुविधांबाबतची माहिती देण्याकरिता तसेच प्रवाशांच्या सूचना तसेच तक्रारी नोंदविण्याकरिता @myBSTBus तर वीजग्राहकांकरिता @myBSTElectric” हे दोन ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आले आहेत. या ट्विटर अकाऊंटची जबाबदारी एका नामवंत खासगी एजन्सीकडे देण्यात आलेली आहे. अकाऊंटला चालविण्याकरिता काही पैसे या खासगी एजन्सीला द्यावे लागत आहे. त्यामुळे बेस्टने प्रशासनाने ट्विटर अकाऊंट हाताळण्याकरिता बेस्टच्या अधिकृती व्यक्तीची नेमणूक करावी, अशी मागणी बेस्ट समितीच्या सदस्यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.

- Advertisement -

बेस्टने अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरु केले, याबद्दल मी अभिनंदन करतो. मात्र हे ट्विटरवर अकाऊंट चालविण्याकरिता बेस्टकडे मनुष्यबळ नाही. ही बाब खूप गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. याची खासगी एजन्सीला जबाबदारी देऊन चालणार नाही. बेस्टने एक जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे.              – सुनील गणाचार्य, सदस्य , बेस्ट समिती

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -