घरमुंबईमुंबईत गर्दी आवरेना, आता बेस्टचा डबल धमाका!

मुंबईत गर्दी आवरेना, आता बेस्टचा डबल धमाका!

Subscribe

डबल डेकर बसची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. त्यामुळे मंगळवारी बेस्टचा ६० डबलडेकर बसेस रस्त्यांवर उतरल्या आहेत

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित लाेकल प्रवास सुरु केल्यानंतर बेस्ट उपक्रमाने आपली विशेष बससेवा बंद केली आहे.त्यामुळे आता बेस्टच्या फेऱ्या वाढल्याने प्रवासी  संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बेस्टच्या बसेसला गर्दी हाेउ लागली आहे.परिणामी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन हाेत नसून काेराेनाचा धाेका वाढताे आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने गर्दीला आवरण्यासाठी ताफ्यातील डबल डेकर बसची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. त्यामुळे मंगळवारी बेस्टचा ६० डबलडेकर बसेस रस्त्यांवर उतरल्या आहेत.

डबलडेकर बसची संख्या वाढली 

काेराेनाचे संक्रमण राेखण्यासाठी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेखाेरपणे पालन हाेणे आवश्यक आहे. त्यासाठी बेस्टच्या एका बसमधून २२ प्रवासी बसून तर पाच प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या बेस्ट प्रशासनातर्फे दिवसाला ३ हजार २०० बसेस चालविण्यात येत आहेत.त्याद्वारे सुमारे १० लाख प्रवासी राेज प्रवास करीत आहेत.त्यामुळे बेस्टच्या बसमध्ये प्रवाशांची एकच गर्दी हाेत आहे. सकाळी आणि संध्याकाळी पिक आवरच्या वेळी बस प्रवाशांनी खच्चुन भरलेल्या असतात.शेवटच्या पायरीपर्यत प्रवासी उभ्याने प्रवास करतात.त्यामुळे काेराेनाची भिती वाढते आहे.बेस्टच्या ताफ्यात एकुण ३ हजार ५०० बसेस आहेत.त्यापैकी १२० डबलडेकर बस आहेत. एक मजली बसमधून ५१ तर डबलडेकर मधून ८८ प्रवासी प्रवास करु शकतात. सध्या फक्त ६ डेपाेमधून मर्यादित डबलडेकर बस चालविण्यात येत आहेत. त्यामुळे एकमजली बससाेबतच डबलडेकर बसची संख्या वाढविली तर जादा प्रवाशांना प्रवास करता येईल,तसेच साेशल डिस्टन्सिंगचे राखले जाईल असे मत प्रवासी वर्गाकडून व्यक्त केले जात आहे. यांची दखल घेत बेस्ट प्रशासनाने डबलडेकर बसेसची संख्या वाढविण्यांत आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -