Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांचे निधन

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांचे निधन

Related Story

- Advertisement -

भारतीय कामगार नेतेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांचे आज सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी मुंबईतील झेन हाॅस्पिटल येथे रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. भारतीय कामगार सेनेच्या विविध क्षेत्रातील संघटनांमध्ये त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे होते. भारतीय कामगार सेनेच्या यशामध्ये महाडिक यांचा मोठा वाटा होता. गेली १७ वर्षे ते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष होते. तसेच दोन वेळा ते आमदारही झाले होते.

सुर्यंकात महाडिक हे २००३ पासून ते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष होते. एप्रिल मध्ये ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार होते. या वयातही त्यांचा कामगार सेनेतील वावर उत्साह वाढवणारा होता. रिझर्व्ह बँक युनियन फेडरेशनचे ते सरचिटणीस होते.

- Advertisement -

सुर्यकांत महाडिक यांच्या पार्थिव देहाचे अंतिमदर्शन मंगळवारी सकाळी ७ ते १० दरम्यान त्यांच्या राहत्या घरी अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्ला-घाटलागांव, चेंबूर येथे निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर अंतिम संस्कार त्यांच्या मुळगावी मु.पो. काडवली, (पाचघर वाडी) ता.खेड, जि. रत्नागिरी येथे करण्यात येईल.

- Advertisement -