भिवंडी पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ अंधारात

भिवंडी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जाणार आहे.

Mumbai
bhiwandi municipal corporation
भिवंडी शहर महानगरपालिका

राज्य विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी भिवंडी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने कामगार कर्मचारी संघर्ष कृतीसोबत १६ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली १२ हजार ५०० रुपयांची सानुग्रह रक्कम देण्यास पालिका प्रशासनाने नकार देऊन ७ हजार ५०० रुपये देण्यावर ठाम राहिले. या वादामुळे बैठक बोंबली आणि २१ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणूकीची आचार संहिता लागू झाली. त्यामुळे भिवंडी पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ यंदा अंधारात जाणार आहे.

नेमके काय घडले?

भिवंडी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने कामगार कर्मचारी संघर्ष कृतीसोबत बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली १२ हजार ५०० रुपयांची सानुग्रह रक्कम देण्यास पालिका प्रशासनाने नकार देऊन ७ हजार ५०० रुपये देण्यावर ठाम राहिले. या वादामुळे बैठक फिस्कटली. त्यानंतर पाच दिवसांचा कालावधी उलटूनही पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावर तोडगा काढण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्यातच आज, शनिवारी विधानसभा निवडणूकीची आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला आता कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात कायदेशीर अडचण निर्माण होणार असल्याने यावर्षीची दिवाळी अंधारात जाणार आहे. पालिका प्रशासनाच्या बेफिकीरीमुळेच कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहणार असल्याने येत्या काळात पालिका प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये सानुग्रह अनुदानासाठी संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – बेस्ट कर्मचार्‍यांची दिवाळी गोड जाणार; ९ हजार १०० रूपये बोनस मिळणार