घरमुंबईभिवंडीत वाहतूक पोलिसाला मारहाण 

भिवंडीत वाहतूक पोलिसाला मारहाण 

Subscribe

भिवंडीत एका वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने मारहाण केल्याची घटना भिंवडीमध्ये घडली आहे.

भिवंडीतील एसीपी कार्यालया समोर दुचाकीस्वारांने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार सचिन वाघमारे (३७) या दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस नितीन राठोड (३७) यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. ड्रायव्हींग लायसन्सला नकार दिल्याने वाहतूक पोलिसांने जाब विचारल्याने ही मारहाण केल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

दुचाकी चालक मोबाईलवर बोलत असल्याने वाहतूक पोलिसांने त्याला थांबण्याचा शारा केला. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांने त्याला अडवून ड्रायव्हींग लायसन्स मागितले. मात्र, ड्रायव्हींग लायसन्सला नकार देत दुचाकी चालकाने हुज्जत घालण्यास सुरुवात करत वाहतूक पोलिसाला मारहाण केली. नितीन सोळाराम राठोड (३७) असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. सदर वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक नियमनाचे काम करीत असताना दुचाकी चालक सचिन दादाराम वाघमारे (३७) भंडारी कंपाऊंड येथील नारपोली कल्याण नाका येथून पुढे जात असताना तो धावत्या गाडीवरुन मोबाईलवर बोलत होता. त्यामुळे त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी तो न थांबता पुढे जाऊ लागल्याने वाहतूक पोलीस कर्मचारी नितीन राठोड यांनी त्यास पाठलाग करून अडवले आणि ड्रायव्हिंग लायसन्स मागितले. त्यावेळी लायसन्स देण्यास नकार देऊन त्याने राठोड यांची शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ करून कानशिलात चापट मारून दुखापत केली. या घटनेप्रकरणी दुचाकी चालक सचिन वाघमारे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पवार करीत आहे.

- Advertisement -

भिवंडी शहर परिसरात वाहतूक पोलिस चिरीमिरीसाठी वाहने थांबवून चालकांना नाहक त्रास देत आहेत. त्याबाबत वरिष्ठांकडे अनेक तक्रारी गेलेल्या आहेत. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे. सदरचा प्रकार देखील अशाच प्रकारे घडल्याचे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे. मात्र, उलट वाहतूक पोलिसांकडून चालकांनाच बळीचा बकरा बनवले जात आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -