घरमुंबईभिवंडीत 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

भिवंडीत 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Subscribe

भिवंडी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिघांनी नामनिर्देशन माघारी घेतल्याने 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून खरी लढत काँग्रेस आघाडीचे सुरेश टावरे आणि भाजप-शिवसेना युतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील या दोघांमध्येच रंगणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुरेश (बाळ्या मामा), म्हात्रे (अपक्ष) यांनी शिवसेना पक्षाकडून दबाव वाढल्याने अखेर माघार घेतली आहे. तसेच योगेश मोतीराम कथोरे (बहुजन महापार्टी), विश्वनाथ रामचंद्र पाटील (कुणबी सेना) या तिघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता प्रमुख राजकीय पक्षांसह 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

- Advertisement -

त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश टावरे, भाजप-शिवसेना, रिपाइं युतीचे कपिल पाटील, व्हीबीएचे डॉ. अरुण सावंत, बाळाराम विठ्ठल म्हात्रे (अपक्ष), दिपक पंढरीनाथ खांबेकर (अपक्ष), फिरोज अब्दुल रहीम शेख ( अपक्ष ), कपिल जयंत पाटील (अपक्ष ), डॉ. नुरुद्दीन निजामुद्दीन अन्सारी (समाजवादी पक्ष ), सुहास धनंजय बोंडे (अपक्ष), कपिल यशवंत ढमणे (अपक्ष), संजय गणपत वाघ (भारतीय ट्रायबल पार्टी), किशोर रामभाऊ किणकर (भारत प्रभात), नवीद हसन मोमीन (अपक्ष), मुमताज अब्दुल सत्तार अंसारी (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी),नितेश जाधव (अपक्ष) आदी 15 उमेदवार आपले राजकीय नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -