घरमुंबईकल्याण मेट्रोचे मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण मेट्रोचे मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

Subscribe

ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो टप्पा क्र ५ च्या मार्गिकेचे भूमिपूजन मंगळवार १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून २००४ साली मुंबई मेट्रो मार्गाच्या आराखड्यास आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या टप्प्यांना मान्यता देण्यात आली होती. ठाणे मेट्रो -४ या ३२ किमी वडाळा ठाणे मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले होते. आता कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचे मंगळवारी भूमिपूजन करण्यात येणार आहे. कल्याण मेट्रो -५ ची लांबी २४.९ किमी असून या मार्गावर १७ स्थानके आहेत. या प्रकल्पात किमान सव्वा तीन हेक्टर खासगी जमीन संपादित करावी लागणार आहे. कार डेपोसाठी १५ हेक्टर बांधकामासाठी ६ हेक्टर जमीन लागणार आहे, तर खासगी ३२५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ८ हजार ४१६ कोटी रूपये आहे.

असा असेल मेट्रो मार्ग

कल्याण एपीएमसी मार्केट-कल्याण मेट्रो-स्टेशन सहजानंद चौक-दुर्गाडी किल्ला-आधारवाडी-गोवेगाव एमआयडीसी- राजनोली -टेमघर- गोपाळनगर- भिवंडी- धामणकर नाका- अंजूरफाटा पूर्णा- कोलशेत आणि कशेळी बाळकूम नाका आणि कापुरबावडी आदी १७ स्टेशन आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -