घरमुंबईमहालक्ष्मीतील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे पुढील महिन्यात भूमिपुजन

महालक्ष्मीतील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे पुढील महिन्यात भूमिपुजन

Subscribe

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि रतन टाटा असणार एकाच व्यासपीठावर

महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणारे भारतातील पहिले अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय महालक्ष्मी येथे उभारले जात आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट(एसडी टिटी) या संस्थेच्यावतीने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर उभारण्यात येणार्‍या रुग्णालयासाठी टाटा ट्स्ट आणि महापालका प्रशासन यांच्यामध्ये लवकरच करारनाम्यावर स्वाक्षरी होणार असून त्यानंतर या रुग्णालयाचे भूमिपुजन होणार आहे. त्यामुळे हे भूमिपुजन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ‘टाटा ट्स्ट’चे रतनजी टाटा यांच्याहस्ते होणार आहे. त्यामुळे रतन टाटा यांनी यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती. त्यानंतर आता रतन टाटा आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही प्रथमच भेट होणार आहे.

परळमधील बैल घोडा नंतर मुंबईत आणखी एक पशुवैद्यकीय रुग्णालय बांधले जात आहे. मुंबई महापालिकेच्या महालक्ष्मी येथील आर्थर रोड कारागृहाच्या मागील बाजूस ३०४५ .४० चौ मीटर चा भूखंड आहे. या भूखंडावर हे पशु वैदयकीय रुग्णालय उभारले जाणार आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट(एसडी टिटी) या संस्थेच्यावतीने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर ३०० ते ४०० खाटांचे हे रुग्णालय बांधले जाणार आहे. या संस्थेला ३० वर्षाच्या कालावधीकरिता हे रुग्ण चालविण्यास दिले जाणार आहे. बांधा, वापरा, आणि हस्तांतरित करा या तत्वावर या जागेवर ही संस्था पशु वैदयकीय रुग्णालयाची उभारणी करणार आहे. ३०० लहान जनावरांसाठी ओपीडी,शल्य चिकित्सा कक्ष अर्थात सर्जिकल वॉर्ड अपघात आणि आपत्कालीन कक्ष आयसीयु आणि आयसीयू कक्ष असणार आहे.

- Advertisement -

या संस्थेला प्रथम जागा देण्याचा निर्णय महापालिकेच्या मान्यतेनंतर घेण्यात आल्यांनतर, तेथील आरक्षित भूखंड या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आधीच्या भूखंडाबरोबरच नजिकचा भूखंडही सुधार समितीच्या मान्यतेने या संस्थेला देण्यात येत आहे. या भूखंडाचा ताबा संबंधित संस्थेकडे देण्यासाठी करारनामाच्या मसुद्याचे काम पूर्ण झाले असून येत्या आठ दिवसांमध्ये संस्था आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्यामध्ये करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करार नाम्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील महिन्यात या रुग्णालयाचे भूमिपुजन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

महापालिकेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील हे पहिलेच अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय असून त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि टाटा ट्स्टचे रतनजी टाटा यांची वेळ घेण्याची लगबग सुरु आहे. त्यामुळे टाटा आणि मुख्यमंत्री यांची तारीख निश्चित झाल्यानंतर उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल,असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे भाजपचे सरकार असताना रतनजी टाटा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि रतन टाटा यांच्या भेटीची चर्चा प्रचंड रंगली होती. त्यानंतर या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने टाटा आणि उध्दव ठाकरेंची भेट होणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -