घरमुंबईबिग बॉस स्पर्धक अभिनेत्रीच्या नवऱ्याला अटक; सावत्र मुलीशी अश्लील वर्तन

बिग बॉस स्पर्धक अभिनेत्रीच्या नवऱ्याला अटक; सावत्र मुलीशी अश्लील वर्तन

Subscribe

बिग बॉस या गाजलेल्या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक राहिलेल्या एका अभिनेत्रीच्या १९ वर्षांच्या मुलीसोबत तिच्याच दुसऱ्या नवऱ्याने अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली पूर्व परिसरात घडली आहे.

बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना कांदिवलीत समोर आली आहे. बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेल्या एका अभिनेत्रीच्या १९ वर्षांच्या मुलीसोबत तिच्याच दुसऱ्या नवऱ्याने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात पीडितेने आईला सांगितल्यानंतर या अभिनेत्रीने समतानगर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तिचा नवरा अभिजित गोहिल (वय ३८) याला अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. बोरीवली न्यायालयाने त्याला १३ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

शेरेबाजी, टोमणे आणि मारहाण!

सदर अभिनेत्री कांदिवली परिसरात राहाते. पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर या अभिनेत्रीने अभिजीत गोहिलसोबत विवाह केला. या अभिनेत्रीला एक १९ वर्षांची मुलगी आहे. मात्र, गेल्या २ वर्षांपासून अभिजीत गोहिल हा देखील त्यांच्यासोबत त्याच फ्लॅटमध्ये राहात होता. मात्र, त्याने अभिनेत्रीच्या १९ वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन सुरू केलं होतं. तिला अश्लील शेरेबाजी करून टोमणे मारणं, मॉडेलचे फोटो दाखवून अश्लील संभाषण करणं, तिचं मानसिक शोषण करणं, तिला मारहाण करणं, जीवे मारण्याची धमकी देणं असे प्रकार तो करत असल्याचं या अभिनेत्रीच्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ पाहिलात का? – तिची तक्रार विनयभंगाची; पोलीस विचारतात ‘दागिने का घातले’!

विकृत बापाला अटक

दरम्यान, सावत्र बापाच्या सातत्यानं होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर या मुलीनं आपल्या आईला सगळा प्रकार सांगितला. धक्का बसलेल्या अभिनेत्रीनं आधी आपल्या नवऱ्याला म्हणजेच अभिजीत गोहिलला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हे प्रकार बंद न केल्यामुळे अखेर त्याच्याविरोधात अभिनेत्रीने समतानगर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर अभिजीतविरोधात ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६, ५०९ भादंवी सहकलम ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -