पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना BMC ने केले क्वॉरंटाईनमुक्त

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत केससंबंधी पाटणाहून आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबई महापालिकेने क्वॉरंटाईनमुक्त केले आहे. रविवार, २ ऑगस्टपासून विनय तिवारी यांना पालिकेने गोरेगाव येथे क्वॉरंटाईन केले होते. क्वॉरंटाईनमुक्त होताच विनय तिवारी थेट पाटणाला निघाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासह आणखी चार पोलीस अधिकाऱ्यांनाही क्वॉरंटाईनमुक्त केले आहे. विनय तिवारी यांना पालिकेने १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले होते. मात्र ५ दिवसातच त्यांना क्वॉरंटाईनमुक्त करण्यात आले आहे. मला पालिकेकडून मेसेज आला असून आपण क्वॉरंटाईनमुक्त होऊ शकता असे कळवण्यात आल्याचे विनय तिवारी यांनी म्हटले आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबईत आलेले बिहार राज्यातील पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेकडून क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारून त्यांना गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या अधीकारी कक्ष येथे क्वॉरंटाईन केले होते. यावर महाराष्ट्र – बिहार पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांची चर्चाही चांगलीच रंगली. दरम्यान, मुंबई महापालिकेने या घटनेवर स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, त्यांनी फक्त केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन केले आहे. पोलीस अधीक्षकाला १५ ऑगस्ट रोजी क्वॉरंटाईनमुक्त करण्यात येणार होते.

हेही वाचा –

Sushant Singh Suicide प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड; सुशांतच्या डायरीची पाने गहाळ