शहापूरमध्ये खड्ड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा बळी

शहापूर-किन्हवली मार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी तरुणाचे प्राण घेतले. याप्रकरणी सार्वजनिक बांधकामविभागातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Thane
Shahapur potholes
खड्डे

तालुक्यातील शहापूर-किन्हवली मार्गावर सापगाव लिबर्टी कंपनीच्या लगत रस्त्यावर पडलेल्या खड्डयांत पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना येथे सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे.
विशाल विशे(२२) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील शहापूर-किन्हवली मार्गावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. दरम्यान विशालच्या नातेवाईकांनी बंधित रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व ठेकेदारावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच तोपर्यंत विशालचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका विशालच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

हेही वाचा – आपात्कालीन परिस्थितीसाठी जे.जे. हॉस्पिटलचा ‘माहिती पुस्तिके’चा उपक्रम

dead vishal vishe
मृत विशाल विशे

उपचारा दरम्यान मृत्यू

एका खाजगी कंपनीत इंजिनिअर असलेला साठगाव गावातील विशाल विशे(२२) हा तरुण नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामावर निघालेला असताना सापगाव येथे लिबर्टी कंपनी जवळील रस्त्यावर त्याचा अपघात झाला. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने मोटारसायकल खड्यात जाऊन आदळली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी जोरात आपटल्याने विशाल याला गंभीर दुखापत झाली. तो दुचाकीवरुन खाली कोसळला. दरम्यान रस्त्यावर ये-जा करणाऱ्या इतर वाहनचालकांनी त्याला उपचारासाठी तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

विशालच्या नातेवाईकांनी संबंधित रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व ठेकेदारावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही, तोपर्यंत सदर विशालचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका विशालच्या नातेवाईकांनी घेतली आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांबाबत संताप व्यक्त होत आहे.