घरमुंबईमुुंबई आयआयटी संशोधकांनी बनवले जैवकृत्रिम स्वादुपिंड

मुुंबई आयआयटी संशोधकांनी बनवले जैवकृत्रिम स्वादुपिंड

Subscribe

मधुमेहाच्या रुणांना ठरणार वरदान!

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक रुग्णांची धडपड सुरू असते. पण मधुमेहाचा त्रास वाढल्यावर त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णाला इन्सुलिन इंजेक्शन, इन्सुलिन पंप किंवा स्वादुपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. अनेकदा शरीर कृत्रिम स्वादुपिंड स्वीकारत नाही. शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली कृत्रिम स्वादुपिंडाविरोधात काम करू लागते. त्यामुळे कृत्रिम स्वादुपिंड रुग्णासाठी धोकादायक ठरते. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी बॉम्बेमधील संशोधकांनी पॉलिमरपासून जैवकृत्रिम स्वादुपिंड बनवले आहे.

जैवकृत्रिम स्वादुपिंडांचा शरीराकडून स्वीकार करण्यात येत असल्याचे शास्त्रज्ञांच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण प्रदीर्घ काळासाठी उच्च राहते. अन्नातील कार्बोदकाचे विघटन ग्लुकोजमध्ये होऊन शरीराला ऊर्जा मिळते. अन्नाचे विघटन होण्यासाठी स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन नावाचे संप्रेरक आवश्यक असते. मात्र मधुमेही रुग्णांमध्ये योग्यप्रमाणात इन्सुलिन निर्माण होत नाही (टाईप 1) किंवा झालेले इन्सुलिन शरीराला वापरता येत नाही (टाईप 2) काही व्यक्तींमध्ये दोन्ही प्रकार घडतात. त्यामुळे अशा व्यक्तींना इन्सुलिन इंजेक्शन, इन्सुलिन पंप किंवा स्वादुपिंड प्रत्यारोपण केले जाते. पण इंजेक्शन व पंप हे अधिक त्रासदायक असल्याने कृत्रिम स्वादुपिंड प्रत्यारोपण केले जात

- Advertisement -

कसे बनवले स्वादुपिंड
बाळाच्या नाळेतून स्टेम पेशी आणि डुकराच्या स्वादुपिंडातून घेतलेल्या आयलेट पेशी वापरून संशोधकांनी जैवकृत्रिम स्वादुपिंड निर्माण केले. संशोधकांनी हे स्वादुपिंड मधुमेह असलेल्या उंदरात प्रत्यारोपित केले असता उंदराच्या इतर अवयवांना त्याचा काहीच त्रास झाला नसल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. उंदराच्या रोगप्रतिकारक प्रणालीने स्वादुपिंडावर हल्ला केला नाही व स्वादुपिंडातील पेशींवर रक्त वाहिन्या निर्माण होताना दिसल्या, अशी माहिती प्राध्यापक जयेश बेल्लारे यांनी दिली.

पेशी व सामग्रीचा योग्य वापर केल्यास आयलेट पेशींचे प्रत्यारोपण हा मधुमेहाच्या उपचारासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. भविष्यात इतर जातीच्या प्राण्यांमध्ये या स्वादुपिंडाचा उपयोग करायची योजना आहे. मुलभूत तंत्रज्ञान सिद्ध झाले असले तरी कृत्रिम स्वादुपिंड मनुष्यासाठी प्रत्यक्षपणे वापरायला अजून बरेच काम बाकी आहे.
– प्रा. जयेश बेल्लारे, संशोधक, आयआयटी बॉम्बे.

- Advertisement -

पण इंजेक्शन व पंप हे अधिक त्रासदायक असल्याने कृत्रिम स्वादुपिंड प्रत्यारोपण केले जाते. पण अनेक रुग्णांचे शरीर हे कृत्रिम स्वादुपिंड स्वीकारत नाही. त्यामुळे अशा रुग्णांसाठी आयुष्य नकोसे वाटते.

आयआयटी बॉम्बेमधील प्राध्यापक जयेश बेल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांनी तंतूचे पोकळ पटल म्हणजे बारीक नलिकेचा वापर करून जैवकृत्रिम स्वादुपिंड बनवले आहे. हे स्वादुपिंड शरीराकडून स्वीकारले जाते व त्यात इन्सुलिन बनवणार्‍या पेशीही निर्माण होतात. नलिकेतून जेव्हा द्रव पदार्थ वाहतो तेव्हा त्याला असलेल्या छिद्रांमधून काही घटक नलिकेच्या बाहेर पडतात आणि काही नलिकेतच राहतात. ही प्रक्रिया डायलिसिसमध्ये वापरली जात असल्याचे बेल्लारे यांनी सांगितले.

पटलाचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीरातील पेशीबाह्य सारणीसारखे काम करत पेशींची वाढ होण्यास मदत करते आणि त्याचबरोबर रुग्णाला इन्सुलिन मिळते. या पेशी नैसर्गिकरित्या निर्माण झाल्या नसल्यातरी त्या रोगप्रतिकारक प्रणालीला विरोध करत नाही. पटलात असलेल्या ‘टी.पी.जी.एस’ संयुगामुळे ते मजबूत आणि स्थिर होतात. पटलाच्या आतील बाजूला काही नॅनोमीटर आकाराची छिद्रे असतात, ज्यातून निवडकपणे इन्सुलिन वेगळे केले जाते. पटलाच्या इतर भागांत अधिक छिद्रे असतात, जी आकाराने थोडी मोठी असतात. संशोधकांनी अशी अनेक पटले एकत्र करून छोटे बायोरिअ‍ॅक्टर निर्माण केले, ज्यात इन्सुलिन निर्माण होते. पॉलिसल्फोनपासून बनवलेल्या पोकळ तंतूच्या पटलासाठी संशोधकांनी पेटंट घेतले आहे. टाईप 1 मधुमेह असलेल्या 5 लाख 42 हजार पेक्षा अधिक मुलांसाठी दिलासादायक ठरू शकते; पण याच्या वापरासाठी अजून बराच वेळ लागणार असल्याचे प्रा. बेल्लारे यांनी सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -