घरमुंबईमुंबई आयुक्तांच्या स्वयंपाकगृहात बायोगॅस

मुंबई आयुक्तांच्या स्वयंपाकगृहात बायोगॅस

Subscribe

प्रकल्पांना बंधनकारक करण्यापूर्वी आयुक्तांची स्वत:पासून सुरुवात

मुंबईतील मोठ्या क्षेत्रफळाच्या गृहनिर्माण संस्थांना बायोगॅस प्रकल्प राबवणे बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी याची सुरुवात स्वत:च्या घरापासून महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांच्या मलबारहिल निवासस्थानावरील ओला कचरा तसेच उद्यानातील पालापाचोळ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जात असून हा गॅस आयुक्तांसह निवासातील नोकरवर्गाच्या कुटुंबातील स्वयंपाक घरात इंधन म्हणून वापरले जात आहे. तब्बल २५ किलो क्षमतेचा हा बायोगॅस प्रकल्प उभारून आयुक्तांनी स्वत:पासून याची सुरुवात करत जनतेला अशा प्रकारचा प्रकल्प राबवण्याचे आवाहन केले आहे.

प्लास्टिक सोडून इतर कचर्‍यापासूवर बायो मिथेनायझेशन तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून गॅस निर्मिती करण्यात येतो. हा गॅस सर्व रहिवाशांना मोफत पुरवला जातो. त्यामुळे मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना तो बंधनकारक करण्यात यावा,अशी मागणी तत्कालिन काँग्रेस नगरसेविका अजंता यादव यांनी केल्यानंतर याबाबतचे पत्र महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्यावतीने नगरविकास खात्याला पाठवले होते.

- Advertisement -

मुंबईतील २ हजार चौस मीटर क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांना अशाप्रकारचा प्रकल्प राबवणे बंधनकारक करण्याची प्रक्रीया सुरु असली तरी महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मलबारहिल येथील निवासस्थानात निर्माण होणार्‍या कचर्‍यापासून बायोगॅस प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, आयुक्तांच्या निवासस्थानी निर्माण होणार्‍या कचर्‍यापासून २५ किलो क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मागील दीड महिन्यांपूर्वी हा प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पातून निर्माण होणार्‍या गॅसचा वापर आयुक्तांच्या स्वयंपाकगृहासह निवासस्थानावरील नोकरवर्गाच्या घरातील स्वयंपाकगृहात इंधन म्हणून वापर केला जात आहे. यासंदर्भात ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी बायोगॅस प्रकल्पाचा यशस्वी प्रयोग झाला असून या प्रकल्पातील गॅसचा वापर स्वयंपाकगृहात इंधन म्हणून वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -