घरमुंबईनगरसेवकांच्या हजेरीसाठी १० बायोमेट्रीक मशीन्स

नगरसेवकांच्या हजेरीसाठी १० बायोमेट्रीक मशीन्स

Subscribe

मशीन्सच्या खरेदीनंतर सध्याची अस्तित्वात असलेली स्वाक्षरीद्वारे नोंदवली जाणारी हजेरीची पद्धत बंद केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेत नगरसेवकांची सभागृहातील हजेरी आता बायोमेट्रीकद्वारे नोंदवली जाणार असून यासाठी तब्बल १० बायोमेट्रीक मशीन्स व १ डोळ्याचे उपकरण खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे याची खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्याची अस्तित्वात असलेली स्वाक्षरीद्वारे नोंदवली जाणारी हजेरीची पद्धत बंद केली जाणार आहे.

हेही वाचा – पिण्याच्या पाण्याने गाड्या धुणार्‍यांवर कारवाई

भाजपाचे मनोज कोटक यांची मागणी

मुंबईचे महापौर व उपमहापौर यांना वगळून सर्व नगरसेवकांच्या आधारकार्ड क्रमांकाशी जोडून बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यात येणार आहे. महापालिका सभागृहाच्या प्रत्येक दरवाज्यावर २ याप्रमाणे ४ दरवाजांवर ८ व अतिरिक्त २ अशी एकूण १० बायोमेट्रीक हजेरी मशीन्स व १ डोळ्याचे मशीन्स याची खरेदी करण्याची कार्यवाही सुरु आहे. या मशीन्स व्यवस्थितरित्या चालू ठेवण्यासाठी या मशीन्सना माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत नेट आणि मुख्यालयात देखभाल विभागामार्फत वायफायची इंटरनेट सेवा घेण्यास, तसेच खबरदारी म्हणून एखादा टेलिकॉम कंपनीच्या २ ते ३ डोंगलद्वारे नेट सुविधाही घेण्यासही व डाटाबेस असलेले सीमकार्ड इत्यादी सर्व बाबींची पुर्तता करण्यात येईल. त्यामुळे या मशीन्स बसवण्यात आल्यानंतर, नगरसेवकांची सध्या घेण्यात येणारी स्वाक्षरीची पद्ध बंद केली जाईल, असे चिटणीस विभागाने स्पष्ट केल आहे. महापालिका सभागृहातील हजेरी बायोमेट्रीकद्वारे नोंदवण्याची मागणी भाजपाचे मनोज कोटक यांनी केली होती. त्यानुसार या पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -