नळातून आलेल्या गढूळ पाण्यात पक्ष्यांची पिसं

Mumbai

शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे संभाजीनगर भागात नागरिकांना ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या गढूळ पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांची पिसंही नळातून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा, पाणीपुरवठा यंत्रणा नादुरुस्त होणे, पंप जळणे असे प्रकार अनेकदा झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. यातच रविवारी आसनगाव शहरातील संभाजीनगर भागातील पाणीपुरवठ्यात पिसं, केरकचरा आढळून आला. या प्रकाराची गंभीर दखल ग्रामस्थ आणि मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश चंदे यांनी घेतली असून संबंधित कर्मचार्‍यांच्या चौकशीची मागणी केली आहे.