Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई मुंबई महापालिकेतील पहारेकरी होणार आक्रमक

मुंबई महापालिकेतील पहारेकरी होणार आक्रमक

विरोधी पक्षात बसण्याचा भाजप नेत्यांचाच विचार

Mumbai
negative effect on income tax of mumbai municipal corporation because of coronavirus
करोनामुळे मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. एकूण मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ५ हजार ४०० कोटी रुपये आहे. मात्र, दहा दिवस शिल्लक असून अजूनही ४ हजार कोटींचा पल्ला लांब आहे.

राज्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर खर्‍या अर्थाने भाजप आणि शिवसेनेची युती संपुष्टात आली आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या बळावर शिवसेनेची सत्ता तरलेली आहे. परंतु राज्यात भाजपच्या सत्ता स्थापनेत शिवसेनेने मिठाचा खडा टाकल्याने आता महापालिकेत भाजप आता पहारेकर्‍याचे कपडे फेकून आक्रमक होताना दिसणार आहे. विशेष म्हणजे भाजपा आता पहारेकरी नव्हेतर विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहून शिवसेनेला सळो की पळो करून सोडणार असल्याचेही संकेत भाजपाच्या नेत्यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढल्यानंतर भाजपचे दुसर्‍या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आले. शिवसेनेपेक्षा दोन नगरसेवक कमी असतानाही भाजपने केवळ राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेची सत्ता कायम ठेवण्यास मदत केली. शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देत पहारेकर्‍याची भूमिका बजावली. परंतु विधानसभा निवडणुकीत युतीचे चित्र उलट पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीत निवडणूक लढवून शिवसेनेने आपला मुख्यमंत्री होईल,असा ठामपणे सांगत भाजपसोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळेच भाजपने, रविवारी राज्यात शिवसेना सोबत नसल्याने भाजप सत्ता स्थापन करणार नाही,अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.

मुंबई महापालिकेत भाजपच्या पाठबळावर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे रविवारच्या नाट्यानंतर शिवसेनेला दिलेला हा पाठिंबा काढून घेण्याचा निर्धार भाजपने केला असून यापुढे पहारेकरी म्हणून नव्हेतर विरोधी पक्ष म्हणूनच सभागृहात बसण्याच्या विचार सध्या भाजपच्या कोअर कमिटीचा असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेमुळे जर राज्यात सत्ता स्थापन करता येत नसेल तर महापालिकेत आपण पहारेकरी का राहायचे असा सवालही काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपने आता विरोधी पक्ष म्हणूनच काम करावे,असा पावित्रा भाजपच्या काही नेत्यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.

भाजपने सुरुवातीच्या काही कालावधीतच पहारेकरी म्हणून चोख भूमिका बजावली होती.परंतु त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेण्याचे आदेश महापालिकेतील भाजप नेत्यांना दिल्यामुळे ते शांत राहिले. त्यामुळे पहारेकरी म्हणून भाजपचे नगरसेवक आक्रमक भूमिका बजावू शकलेले नाहीत. त्यामुळेच भाजपच्या नगरसेवकांमध्ये एकप्रकारे नैराश्यच पसरले होते. पण आता शिवसेनेची अडेलतट्टू भूमिका पाहता, भाजपचे नगरसेवकही आक्रमक होण्याच्या तयारीला लागले आहेत.

भाजपचे गटनेते मनोज कोटक हे खासदार झाल्यानंतर, त्यांची महापालिकेतील उपस्थिती कमी झाली होती. परंतु येत्या काळात मनोज कोटक हेही आता आवर्जुन महापालिकेच्या सभांना उपस्थित राहत शिवसेनेवर शरसंधान साधण्याची संधी सोडणार नाही. भाजपची यादृष्टीकोनातून रणनितीही तयार होत असून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, अतुल शहा,अभिजित सामंत, विद्यार्थी सिंह,अ‍ॅड. मकरंद नार्वेकर, प्रकाश गंगाधरे, कमलेश यादव, दक्षा पटेल,ज्योती अळवणी, प्रिती सातम, संदीप पटेल,सुनील यादव, सुषम सावंत, राजेश्री शिरवाडकर, योगिराज दाभाडकर, हरिष छेडा, स्वप्ना म्हात्रे आदींची टिम महापालिकेत आता अधिक आक्रमक होताना दिसणार आहेत.

तर भाजपकडे आपोआपच येणार विरोधी पक्षनेतेपद
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे अपक्षांसह एकूण ९४ नगसेवक असून राष्ट्वादी काँग्रेसची मदत घेतल्यास त्यांचा मॅजिक ११४चा आकडा पूर्ण होत नाही. त्यामुळे शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. काँग्रेसने जर महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्यास, काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद जावू शकते. त्यामुळे पहारेकरी म्हणून असलेल्या भाजपला विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागणार आहे. भाजपने विरोधी पक्षनेतेपद न स्वीकारल्याने, दुसर्‍या क्रमांकावरील मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आले. यासाठी सुुरुवातीच्या काही महिन्यांपर्यत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती.