‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम वेगानं सुरू’

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरून होणाऱ्या टीकेला आता भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचा मानबिंदु ठरेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदु मिलच्या जागेवर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. असं भाजपनं म्हटलं आहे.

Mumbai
babasaheb monument
फोटो सौजन्य - DNA India

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरून होणाऱ्या टीकेला आता भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचा मानबिंदु ठरेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदु मिलच्या जागेवर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. तेथील पायलींगचे कामही पूर्ण झाले आहे. सत्ताभ्रष्ट झाल्याने सैरभैर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने वाट्टेल ते आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये, असे प्रत्युत्तर भाजपाने दिले आहे. शिवाय, भाजपच्या या आरोपांवर जनता विश्वास ठेवणार नाही असं देखील यावेळी भाजपनं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर, असं म्हणत सरकार दिशाभूल करतंय असा आरोप केला आहे. त्याला आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या बांधकामाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत होते तशी केवळ घोषणाबाजी भाजपाच्या काळात होत नाही, असं देखील भाजपनं यावेळी म्हटलं आहे.  डॉ. आंबेडकर यांचे स्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, या स्मारकांसाठीच्या सर्व परवानग्या विक्रमी वेळेत प्राप्त झाल्या आहेत. कोस्टल रोडच्याही सर्व परवानग्या मिळाल्या आहेत अशी माहिती देखील यावेळी दिली गेली. आंबेडकरी अनुयायांमध्ये संभ्रम करण्याचं काम राष्ट्रवादीनं करू नये. २०१९मध्ये राज्यातील जनता त्यांना त्यांची खरी जागा दाखवेल अशा शब्दात भाजपनं राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे.

निवडणुकांच्या तोंडावर आता बाबासाहेबांच्या स्मारकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीच्या आरोपाला आता भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here