Live: सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार? ‘वर्षा’वर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

शनिवारी राज्यपालांनी नियमांनुसार निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजप पक्षाला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या कोअर कमिटीची 'वर्षा' बंगल्यावर सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Mumbai
BJP core members meeting organised at Varsha bunglow
'वर्षा'वर भाजपच्या कोर कमिटीची बैठक

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १६ दिवस होऊन गेले, मात्र अध्यापही महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान, ९ नोव्हेंबरला म्हणजे काल रात्री बारा वाजता गेल्या पाच वर्षांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. राज्यापालांनी त्यांच्यावर सध्याचे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. शनिवारी राज्यपालांनी नियमांनुसार निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजप पक्षाला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’ बंगल्यावर सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या कोर कमिटीच्या बैठकीत राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटू शकतो अशी आशा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य कोअर कमिटीच्या बैठकीकडे लागले आहे.