Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनाची लस घेणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या लोकप्रतिनिधीचा कोर्स पूर्ण!

कोरोनाची लस घेणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या लोकप्रतिनिधीचा कोर्स पूर्ण!

Related Story

- Advertisement -

नव वर्षाच्या सुरुवातीलाच दोन लसींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता देऊन सरकारने देशवासियांना दिलासा दिला. यापूर्वी स्वयंसेवक म्हणून अनेकांनी कोरोनाची लस घेतली. यामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे सुपुत्र आणि भाजप नगरसेवक नील सोमय्यांनी देखील भाग घेतला होता. १६ डिसेंबरला नील सोमय्या यांनी सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला डोस घेतला. २८ दिवसानंतर आज त्यांनी कोरोना लसीचा दुसरा आणि शेवटचा डोस घेतला आहे. नील सोमय्या हे कोरोना लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले लोकप्रतिनिधी आणि मुंबईचे पहिले नगरसेवक ठरले आहेत.

याबाबत नील सोमय्या यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘आज मी ‘कोव्हॅक्सिन’ लस चाचणीत भाग घेऊन कोर्सचा दुसरा आणि शेवटचा डोस सायन रुग्णालयात घेतला. आयसीएमआरद्वारा नियमित ‘कोव्हॅक्सिन’ लस चाचणी प्रकल्पात सक्रिय भाग घेणारा मी पहिला महाराष्ट्रातील पहिला लोकप्रतिनिधी आणि मुंबई महापालिकेचा पहिला नगरसेवक असल्याचा मला अभिमान वाटतो.’

- Advertisement -

नील सोमय्या यांचा कोरोना लस घेतल्यानंतर अनुभव

कोरोना लस घेणाऱ्या नील सोमय्यांचा अनुभव | neil somaiya share experience after taking covaxin

मुंबई महापालिकेचे पहिले नगरसेवक ज्यांनी कोरोना लस टोचून घेतले ते म्हणजे भाजपचे नगरसेवक नील सोमय्या. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतरचा नील सोमय्या यांचा अनुभव नक्की काय होता? ते पाहा.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, January 7, 2021


- Advertisement -

हेही वाचा – लसीबाबत कोणताही गैरसमज ठेऊ नका – किशोरी पेडणेकर


 

- Advertisement -