भाजप सरकारला प्रियांका गांधींची भीती वाटते – बाळासाहेब थोरात

प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Mumbai
Priyanka gandhi
प्रियांका गांधी

भाजप सरकार प्रियांका गांधी यांना घाबरत आहे. म्हणूनच प्रियांका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधी यांना अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर पश्चिम येथे इंडियाबुल्स समोर तीव्र निदर्शने केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहनसुद्धा केले.

हेही वाचा – अलिबागहून आलास का? वर बंदी नाही

पीडितांना भेटायला जाणे गुन्हा आहे का?

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृतीचा निषेध करून आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, ”उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे बुधवारी जमिनीच्या वादातून गोळीबार करून १० जणांची हत्या करण्यात आली. या हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी सोनभद्र येथे जात असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक केली आहे. हिंसाचारात बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला जाणे गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल करून उत्तर प्रदेश पोलिसांनी नेत्यांना अटक करण्याऐवजी गुन्हेगारांना अटक करावी,” असे आमदार थोरात म्हणाले.

उत्तर प्रदेशात गुन्हेगार खुलेआम हत्या करतायेत, दरोडे घालतायेत. समाजकंटक दंगली घडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी उत्तर प्रदेश पोलीस विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक का करत आहेत? उत्तर प्रदेशात सर्वसामान्यांच्या हक्कांची गळचेपी सुरु असून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे.
बाळासाहेब थोरात, आमदार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here