भाजपने पक्ष बदलाचा बाजार मांडलाय

Mumbai
NCP MLA Jayant Patil
मंत्री जयंत पाटील यांचे टिकास्त्र

भाजपने पक्ष बदलाचा बाजार सुरू केला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंबाजोगाई येथील जाहीर सभेत केली. वेगवेगळ्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचे प्रकार भाजपकडून सुरू आहेत, असे पाटील म्हणाले. पवारसाहेबांनी सगळे काही दिले. खुर्चीशिवाय त्यांना कुठेही बसवले नाही ते लोक पक्ष सोडून गेले आहेत, असा समाचार घेतानाच त्यांच्या जाण्याने नवीन तरुणांना संधी मिळाली आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. माध्यमात येणार्‍या गोष्टींपेक्षा जमिनीवरील परिस्थिती आज वेगळी आहे, असे पाटील यावेळी म्हणाले. पूरपरिस्थिती होती त्यामुळे मी शिवस्वराज्य यात्रेत नव्हतो, परंतु परिस्थिती निवळ-ल्यानंतर आलो आहे, असे पाटील यांनी सांगितले.