घरमुंबई'लाव रे तो व्हिडिओ'मुळे भाजपा सैरभैर; सोशल मीडिया टीमवर आला ताण

‘लाव रे तो व्हिडिओ’मुळे भाजपा सैरभैर; सोशल मीडिया टीमवर आला ताण

Subscribe

सध्या भाजपाची सोशल मीडिया टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे आहे याची माहिती घेऊन, त्यानंतर ही टीम कामाला लागते

लाव रे तो व्हिडिओ…सध्या राज्यासह देशात या एका वाक्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुगल असो की फेसबुक सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओ या एकाच वाक्याची चर्चा आहे. सत्ताधारी भाजपाला तर राज ठाकरेंच्या या एका वाक्याने तर अक्षरशः धडकी भरली आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडून भर सभेत भाजपावर व्हिडिओ दाखवून केलेले आरोप खोडून काढण्यासाठी भाजपाची संपूर्ण सोशल मीडिया टीमचं कामाला लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोदींच्या दत्तक गावाची काय तऱ्हा; रायगडमध्ये राज ठाकरेंनी दाखवला ग्राऊंड रिपोर्ट!


भाजपची सोशल मीडिया टीम लागली कामाला

भाजपाच्या सोशल मीडिया टीमला तर थेट आदेशच देण्यात आले आहेत की, इतर नेत्यांच्या सभांपेक्षा फक्त आणि फक्त राज यांच्या सभेवर लक्ष देऊन त्याला उत्तर कसे देता येईल याचे नियोजन करा. त्यामुळेच सध्या भाजपाची सोशल मीडिया टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे आहे याची माहिती घेऊन, त्यानंतर ही टीम कामाला लागली आहे. तसंच राज ठाकरेंचे किंवा राज ठाकरे यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केलेल्या जुन्या क्लिप्स शोधून राज ठाकरेंच्या भाषणाची तोडफोड करून या क्लिप त्यामध्ये जोडल्या जातात. यासाठी भाजपाच्या सोशल टीमने बरीच नवीन मुले कामासाठी घेतली आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र’ या भाजपाच्या फेसबुक पेजवरून राज ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. कधी राज ठाकरेंचे व्यंगचित्र बनवून त्यातून त्यांच्यावर टीका करण्यात येते तर त्यांच्यावर टीका करणारे व्हिडिओ भाजपाच्या सोशल टीमकडून बनवले जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मोदींनी माढ्यात स्वत:ची जात सांगितली, राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत उत्तर दिलं!


विरोधकांपेक्षा राज ठाकरे ठरले डोकेदुखी

राज्यात सगळीकडे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेऱ्यांच्या जाहीर सभा होत आहेत. मात्र या नेत्यांच्या जाहीर सभांकडे भाजपाची सोशल टीम जितकं लक्ष देत नसून, राज ठाकरेंच्या सभेकडे बारकाईने लक्ष देत आहेत. तसे आदेशच त्यांना वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज ठाकरेंचा सभांचा धडाका कधी संपतोय अशीच काहीशी अवस्था भाजपाच्या सोशल टीममध्ये काम करणाऱ्यांची झाली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरेंच्या ‘चल लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्याची तोडफोड करून मनसेच्या महिला पदाधिकारी साडी चोरतानाचे व्हिज्युअल लावण्यात आले आणि हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांच्या माहिती देणाऱ्या वॉट्स अप ग्रुपवरच शेअर करण्यात आला आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देखील राज यांच्या लाव रे तो व्हिडिओकडे बारीक लक्ष देत असल्याचे पहायला मिळत आहे.

विनोद तावडेंनाही लावले कामाला

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे विरोधकांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्याची जबाबदारी भाजपाने दिली असून, सध्या विनोद तावडे देखील राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर विनोद तावडे पत्रकार परिषद घेऊन टीका करताना पहायला मिळत आहे. तसेच खुद्द मुख्यमंत्री देखील आपल्या जाहीर सभामध्ये राज ठाकरे यांना लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणातील लाव रे तो व्हिडिओने भाजपाच्या नेत्यांची आणि सोशल मीडिया टीमची झोप उडाली हे मात्र नक्की.

‘निवडणुकीत एकही उमेदवार नसताना राज ठाकरे कुणासाठी सभा घेत आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. राज ठाकरेंची स्क्रिप्ट ही बारामतीमधून येत असून, सध्या टुरिंग टॉकीजचे शो सुरू आहेत.’ – विनोद तावडे, शिक्षण मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -