घरताज्या घडामोडीग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपची २८ कार्यकर्त्यांची फौज

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपची २८ कार्यकर्त्यांची फौज

Subscribe

ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यासाठी २८ कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आली असून हे सर्व २८ कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या परिस्थिचा आढावा घेणार आहेत. आता हे कार्यकर्ते आपल्या मार्गाने निघाले आहेत. ‘साडे चौदा हजार ग्रामपंचायत निवडणुकीत अतिशय चांगले यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

‘दोन दिवस नियमितपणे बैठकाचा भाग म्हणून सर्व बैठका झाल्या. मधल्या काळात कोरोना काळात इतर बैठका झाल्या पण संघटनात्म बैठका झाल्यात. साडे १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकामध्ये यश मिळेल. ११ फेब्रुवारीला दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृती दिन असतो त्यादिवशी समर्पण दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. संघटनात्मक प्रवास आणि वाढ यामध्ये कोरोनामुळे थोडासा अडथळा निर्माण झाला तो आता दूर करत आहोत,’ असे पाटील म्हणाले.

- Advertisement -

तसेच पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘तुम्ही लढा आम्ही कपडे संभाळतो असे भाजप करत नाही. आत्मनिर्भर भारत ही भाजपची आणि मोदींची संकल्पना आहे. या लोकांना ईव्हीएम का नको याची प्रात्यक्षिक मी मांडणार आहे. ग्रामपंचायतीत पक्ष हा विषय नसतो. त्या पॅनलवर लढल्या जातात. गावचे राजकारण हे मिळून असते. ज्या ज्या आक्रमकाच्या खुणा आहेत त्याचा आपण का आग्रह धरत आहोत.’


हेही वाचा –  राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान – रावसाहेब दानवे पाटील

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -