Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई सुरक्षेच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरोधकांमध्ये कोल्डवॉर

सुरक्षेच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरोधकांमध्ये कोल्डवॉर

Related Story

- Advertisement -

भाजपमधील बड्या नेत्यांच्या सुरक्षा काढून घेण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातूनही जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे सरकारने अनेक बड्या भाजप नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर ट्विटरवर युद्ध सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. सुरक्षेच्या मुद्द्याच्या निमित्ताने केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष बघायला मिळत आहे. ठाकरे सरकारच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सर्वेसर्वा खुद्द शरद पवार यांनी माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या असे गृहमंत्र्यांना सांगणाऱ्या फोनची चर्चाही राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली.

कोणाकोणाच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात ?

decision on security of VVIP

- Advertisement -

 

 

कोण काय म्हणाले ?

- Advertisement -

 

कॉंग्रेस परिवाराची सुरक्षा कमी करताना उकळ्या फुटल्या – सचिन सावंत

भाजपा नेत्यांना धोका नसल्याने सुरक्षा कमी झाली तर आकांडतांडव, आक्रोश, आकांत, विलाप , बोंब इ. भावना उचंबळू लागल्या. परंतु गांधी परिवाराला धोका असतानाही त्यांची व डॉ मनमोहन सिंहांची सुरक्षा, स्टाफ कमी करताना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मोदीजींची सूड भावना असते, मविआ सरकारची नाही.

 

माझीसुद्धा सुरक्षा कमी करावी – शरद पवार

ज्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यानुसारच सुरक्षा व्यवस्थेच्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळे माझीही सुरक्षा व्यवस्था कमी करावी. कोणी विरोधी पक्षाचा आहे, अशातला भाग नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालाची अंमलबजावणी – अनिल देशमुख

आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती केली. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी Threat perception म्हणजे ज्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यानुसार अहवाल दिला. या अहवालाची आम्ही अंमलबजावणी केली आहे. या अहवालाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनीही माझी सुरक्षा कमी करावी म्हणून फोन केल्याचे त्यांनी सांगितले.

 

कोणा कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार ? – राम कदम

महाराष्ट्र सरकार सुडाच्या भावनेतून भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचे दुस्साहस  करत आहे. जर सुरक्षा कपाती नंतर काही बर वाईट झाल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी #MVA ची असेल हे याद राखा. आणखी कोणा कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार?

लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हिच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी. – चंद्रकांत पाटील

 

नक्षलवाद संपलेला दिसतोय – सुधीर मुनगंटीवार

सरकारचे धन्यवाद ! आपण माझी सुरक्षा काढली, नक्षलग्रस्त जिल्हात असल्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली होती. पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय. आमची सुरक्षा काढली असली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल.

मनसेचीही टीका

ज्याच्या कडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे त्यांची काय झेड सुरक्षा काढून तीर मारणार आहात

शेवटी महविकास आघाडी पण…

Posted by Rupali Patil Thombare on Saturday, January 9, 2021


 

 

- Advertisement -