घरमुंबईमहाविकासआघाडीची सत्ता येतेय? भाजपच्या मंत्र्यांनी रिकामे केले बंगले

महाविकासआघाडीची सत्ता येतेय? भाजपच्या मंत्र्यांनी रिकामे केले बंगले

Subscribe

शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आपल्या मंत्रालयासमोरील बंगल्यातील सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महाविकासआघाडीची राज्यात सत्ता स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित होत आहे. त्यामुळेच भाजपच्या नेत्यांनी आपले शासकीय बंगले रिकामी करायला सुरुवात केली आहे. शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आपल्या मंत्रालयासमोरील बंगल्यातील सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आशिष शेलार यांचा मंत्रालयासमोर ब ३ हा बंगला आहे. आज त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची नेहरू सेंटर येथे एकत्रित बैठक

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची नेहरू सेंटर येथे एकत्रित बैठक होत आहे. त्याआधी दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये महाविकासआघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आतापर्यंत महाविकासआघाडी प्रत्यक्षात येणार नाही, असा पवित्रा भाजपकडून घेण्यात येत होता. तसेच राज्यात केवळ भाजपच सत्ता स्थापन करु शकते, असा दावा देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व्यक्त करत होते. मात्र महाविकासआघाडीची चर्चा सकारात्मक आणि निर्णायक वळणावर आल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी बंगले रिकामे करायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सेना-भाजप युती तुटणं मराठी माणसासाठी हानिकारक – गडकरी


नोव्हेंबरच्या शेवटी नवे सरकार मिळणार

सध्या ज्या घडामोडा चालू आहेत, त्यावरून तरी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात शपथविधी होईल, असे कळत आहे. येत्या दोन दिवसांत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत आमदारांच्या सहीचे पत्र देण्यात येईल. राज्यपालांना बहुमताची खात्री झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाला तसा प्रस्ताव देण्यात येईल. केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रपती राजवट हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो प्रस्ताव राष्ट्रपतींना पाठविण्यात येईल. शेवटी राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्यपाल महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवतील. केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे या सर्व कालावधीला नेमका किती वेळ लागेल, याचा अंदाज आज वर्तविता येणार नाही. मात्र महाविकासआघाडीचे नेते ही प्रक्रिया जलदगतीने व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -