घरमुंबईभाजप आमदार राम कदम यांची 'मोटार सायकल भेट' वादात!

भाजप आमदार राम कदम यांची ‘मोटार सायकल भेट’ वादात!

Subscribe
सिग्नल मोडणाऱ्या तरूणाईला आता भाजप आमदाराकडून आयती मोटरबाईक भेट स्वरूपात देण्यात येणार आहे! मोटरसायकलचा परवाना मिळण्याचे वय नसतानाही या बाईक देण्यात येणार असल्याने ट्विटरकरांनी भाजप आमदार राम कदम यांना ट्रोल केले आहे. मनसेतून भाजपामध्ये गेलेले घाटकोपर विक्रोळी विभागाचे सध्याचे आमदार राम कदम यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेमुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.

काय आहे घोषणा?

डॅशिंग आणि दयावान आमदार म्हणून चर्चेत राहू पाहणारे भाजपाचे आमदार राम कदम यांनी दहावी आणि बारावीमधल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोटारसायकल देणार असल्याची घोषणा त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. याबरोबरच लकी ड्रॉ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देणार असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे. त्याचबरोबर ‘ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा’ असं सांगायलाही ते विसरलेले नाहीत.

राम कदमांची भेट नियमबाह्य?

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांचे वय हे अनुक्रमे १६ किंवा १८ वर्षांच्या आसपास असते आणि सरकारकडून १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय गाडी चालवण्याचा परवानासुद्धा दिला जात नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना मोटारसायकल देऊन राम कदम नेमकं काय दाखवू पाहत आहेत? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थांना पुढील शिक्षणाला मदत म्हणून शालोपयोगी वस्तू न देता त्यांना मोटारसायल देऊन त्यांचे भविष्य खराब केले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अंजली दमानियांचीही प्रश्नांची सरबत्ती

‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांनीसुद्धा राम कदम यांना ट्विटरवरुन खडे सवाल केले आहेत. १५ ते १७ वर्षांच्या मुलांना कायदा मोडून तुम्ही मोटारसायकल देणार का? आणि इतके पैसे आले कुठून? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -