घरमुंबई‘हॅशटॅग मैं मोदी के साथ’; मोहिमेला सुरूवात

‘हॅशटॅग मैं मोदी के साथ’; मोहिमेला सुरूवात

Subscribe

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी ‘हॅशटॅग मैं मोदी के साथ’ही अनोखी मोहिम सोशल मीडियावर सुरु केली आहे.

निवडणुका आल्या की प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या युक्त्या आजमावताना दिसतात. आता येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अशीच एक युक्ती केली आहे. भारतीय जनतेला विशेष करून तरुणाईला आपल्यासोबत जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी ‘हॅशटॅग मैं मोदी के साथ’ ही अनोखी मोहिम सुरु केली आहे.

हॅशटॅगची मोहिम सुरु

मोहित भारतीय यांनी ‘हॅशटॅग मैं मोदी के साथ’ याविषयी अशी माहीती दिली की, या मोहिमेला मुंबईत व्यापक रुप दिले जाणार आहे. मुंबई शहरातील लोकांपर्यंत ही मोहीम पोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याआधी मोहित भारतीय यांच्या ‘जो देश के साथ, वो मोदी के साथ’ आणि ‘संकल्प हमारा, मोदी दोबारा’या दोन घोषणा सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या आहेत.

- Advertisement -

युवकांसाठीच्या योजनांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चालू कार्यकाळात केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय योजना या सुरु झाल्या आहेत. विशेषत: युवकांसाठी राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती या माध्यमातून जनतेला दिली जाणार आहे. तसेच त्याचा लाभ कसा घ्यावा आदींचे मार्गदर्शन केले जाणार आहे, असे मोहित भारतीय यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लाखो तरुण स्टार्टअप इंडिया सारख्या योजनेतून स्वावलंबी झाले आहेत. त्याचा अभिमान वाटतो, असे मोहित भारतीय म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -