घरमुंबईVideo : 'संजू वर्मा' या भाजपच्या बेशरम प्रवक्ता - जितेंद्र आव्हाड

Video : ‘संजू वर्मा’ या भाजपच्या बेशरम प्रवक्ता – जितेंद्र आव्हाड

Subscribe

सीएसएमटी पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार मानणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा या बेशरम असून त्या डोक्यावर पडल्या आहेत का?, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेला हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच ‘भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा या बेशरम’ असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवरुन केले आहे. ‘सीएसएमटी जवळचा पादचारी पूल कोसळण्याच्या घटनेला पादचारी जबाबदार आहेत, असे धक्कादायक वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्या संजू वर्मा हीने मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

हा पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झालेल्यानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले होते. ‘या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात टोलवाटोलवी सुरु झाली. या दरम्यान, दिल्लीमध्ये तिच्या फडफडणाऱ्या इंग्रजीमध्ये या घटनेला पादचारीच जबाबदार आहेत, असे धक्कादायक वक्तव्य करत आहे.

‘रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर कमीत कमी दिलगीरी तरी व्यक्त केली पाहीजे. तर दुसरीकडे भाजपच्या प्रवक्त्या सत्य परिस्थीती माहिती असताना देखील पादचाऱ्यांना दोष देत आहेत. ज्या पादचाऱ्यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. तेच या घटनेला जबाबदार असल्याचे बोलत आहेत. हे डोक्यावर पडले आहेत का? याप्रकरणी भाजपाने आणि पियुष गोयल यांनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे’, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisement -

वाचा – २४ तासात अहवाल द्या; पालिका आयुक्तांचे दक्षता विभागाला आदेश

वाचा – CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -