घरमुंबईनिकालापूर्वीच भाजपाची विधान सभेची तयारी

निकालापूर्वीच भाजपाची विधान सभेची तयारी

Subscribe

दुष्काळ परिस्थितीमुळे आणि राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे भाजपाने निवडणूक आढावा बैठक पूढे ढकलली आणि आता ही आढावा बैठक येत्या २१ मे रोजी होणार आहे.

लोकसभा निवडणुकी १९ मे रोजी संपत असून, २३ मे रोजी निकाल लागणार आहेत. मात्र निकलाआधीच भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूक आढावा घेण्यासाठी आणि विधानसभेच्या पूर्व तयारीसाठी भाजपाने २१ मे रोजी दादरच्या वसंत स्मृती येथे महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार, खासदार, लोकसभेचे उमेदवार, संघटक मंत्री, प्रभारी आणि संयोजक यांना बोलावण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही बैठक मे च्या पहिल्या आठवड्यात होणार होती मात्र दुष्काळ परिस्थितीमुळे आणि राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे भाजपाने निवडणूक आढावा बैठक पूढे ढकलली आणि आता ही आढावा बैठक येत्या २१ मे रोजी होणार आहे.

काय आहे या बैठकीत खास

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने काम करण्यात आले. याचा सर्व आमदार, खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा अध्यक्ष, विभाग संघटक, विभाग अध्यक्ष, प्रभारी आणि संयोजकांना निमंत्रणासोबत एक दोन पानी पेपर देखील पाठवण्यात आला असून, यामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी कशी राहिली, जाहीर सभा किती झाल्या, व्हिडिओ रथ कार्यक्रम किती झाले, बूथ रचना कशा पद्धतीची होती, बूथ वर किती कार्यकर्ते होते, सोशल मीडियावर कशा पद्धतीचा प्रचार करण्यात आला, सरकारी योजनेच्या किती लाभार्थ्याशी संपर्क केला, किती लाभार्थ्यांच्या घरावर टिकर लावलेत यासह अनेक प्रश्नांची उत्तरे लिहून हा पेपर १७ मे पर्यत भाजपा कार्यालयात पाठवायचा आहे. त्यानंतर या बैठकीत मार्गदर्शन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान त्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० मे रोजी वर्षावर बैठक घेणार आहेत.

- Advertisement -

नाराजांची नाराजी दूर होणार ?

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण, किरीट सोमय्या, दिलीप गांधी, अनिल शिरोळे, ए टी नाना पाटील, सुनील गायकवाड, शरद बनसोडे यांना उमेदवारी नकारण्यात आली होती. यातील काही जण नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या नाराजांना देखील बैठकीला खास बोलावण्यात आले असून, त्यांची नाराजी देखील दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

निकालानंतर विधानसभा फोकस

तसेच २३ मे रोजी निकाल लागल्यानंतर कशा पद्धतीने विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागेल याचे देखील मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येणार आहे. एवढंच नाही तर रराज्यातील दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊनही काही सूचना आमदार, खासदार, आणि पदाधिकाऱ्यांना केल्या जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -