Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ५०० चौ. फूट घरांच्या मालमत्ता करमाफीचं झालं काय? भाजपचा सवाल!

५०० चौ. फूट घरांच्या मालमत्ता करमाफीचं झालं काय? भाजपचा सवाल!

Related Story

- Advertisement -

मुंबईतील ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कधी करणार? असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी आज मुंबई महानगर पालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत उपस्थित केल्याने सत्ताधारी व पालिका प्रशासनाची गोची झाली. पालिका अधिकाऱ्यांनी भाजपला त्यावर योग्य ते उत्तर न दिल्याने अखेर नाराज भाजप नगरसेवकांनी निषेध व्यक्त करीत सभात्याग केला. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेतर्फे वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याचे आश्वासन दिले होते. आज तीन वर्षे उलटली आणि राज्यात शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तरीही या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याने भाजप नगरसेवकांनी आज पालिका विधी समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करीत सत्ताधारी शिवसेनेला डिवचले. तसेच, पालिका प्रशासनाला फैलावर घेत जाब विचारला. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना नगरसेवक आणि प्रशासन हतबल झाले.

भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत, अतुल शाह, अनीश मकवानी यांनी या विषयाला वाचा फोडली. तसेच, त्या ५००चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी त्वरित लागू करावी, आयुक्तांनी या विषयावर निवेदन करावे, अशी मागणी नगरसेवक अभिजित सामंत यांनी यावेळी केली.

- Advertisement -

मात्र प्रशासनाने या विषयावर चालढकल केल्याने भाजप नगरसेवक आक्रमक झाले व त्यांनी सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सभात्याग केला.

- Advertisement -