घरमुंबईतुमची झाली युती , माझी झाली माती

तुमची झाली युती , माझी झाली माती

Subscribe

भाजप- शिवसेना युती झाल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रामटेक मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले. यामुळे काहीसे नाराज झालेल्या आठवले यांनी खास त्यांच्या शैलीत ‘ मन की बात ‘ बोलून दाखवली आहे. ‘तुमची झाली युती आणि आमची झाली माती,’ असे आठवले यांनी नागपूरमध्ये गडकरींच्या प्रचारसभेत म्हटले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई किंवा रामटेक या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. भाजप आणि शिवसेनेची युती होणार शक्यता त्यावेळी दिसत नव्हती आणि त्यामुळे आठवले समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. खुद्द आठवले यांनी जाहीरपणे या दोन मतदार संघातून निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अमित शाह यांच्या मुंबई दौर्‍यानंतर भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आणि आठवले यांचे लोकसभेचे स्वप्न भंगले. मंगळवारी नागपूरमधील सभेत त्यांनी ही सल बोलून दाखवली.

- Advertisement -

तुमची झाली युती आणि आमची झाली माती, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच राहुल गांधी सातत्याने आमच्यावर टीका करत आहे. करा तुम्हाला जेवढी करायची असेल नरेंद्र मोदींवर टीका, पचवायची कशी ते माझ्याकडून शिका, असे म्हणत त्यांनी कवितेद्वारे काँग्रेसला चिमटा काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -