घरमुंबईभाजपची पहिली यादी १६ मार्चला जाहीर होणार

भाजपची पहिली यादी १६ मार्चला जाहीर होणार

Subscribe

आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असताना युतीची यादी कधी जाहीर होणार अशी चर्चा रंगलेली असताना भाजपाच्या पहिल्या यादीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या शनिवारी म्हणजे १६ मार्चला भाजपाची पहिली यादी जाहीर होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतून जाहीर होणाऱ्या या पहिल्या यादीत १७ ते १८ जणांचा समावेश असणार आहेत. यामध्ये राज्यातील सात जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिल्लीमध्ये संसदीय बोर्डाच्या बैठकीमध्ये या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील आणि संघटन मंत्री विजय पुराणिक दिल्लीच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. तसेच राज्यातील अजून पाच ते सहा जागांवर भाजपाची कोअर कमिटी यावर विचार विनिमय करत आहेत. यामध्ये अहमदनगर, सोलापूर, लातूर, गडचिरोली – चिमूर, नांदेड आणि माढा या जागांचा समावेश आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवर देखील चर्चा सुरू असून, किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांचा विरोध मावळताना दिसत नाही त्यामुळे सोमय्या यांच्या उमेदवारीवर देखील जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या संसदीय बोर्डाच्या बैठकीला उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील आणि संघटन मंत्री विजय पुराणिक दिल्लीच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत.भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवास्थानी पार पडली. बैठकीला भाजपाचे खासदार-आमदार उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीत लोकसभा मतदारसंघ प्रमुख, राज्यसभा खासदार आणि विधानपरिषद आमदारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीत सोशल मीडिया प्रमुखांशी देखील चर्चा करण्यात आली आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करता सोशल मीडियावर प्रचार कसा करावा यावरही चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

काही विद्यमान खासदरांचा पत्ता गुल होण्याची शक्यता 

दरम्यान काही विद्यमान खासदारांचा पत्ता गुल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ययामध्ये दिलीप गांधी यांच्या नावाची आहे. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी जनमानसामध्ये जर एखाद्या खासदारांला विरोध होत असेल तर त्या खासदाराचे तिकीट नक्कीच कापणार असे सांगितले. सगळ्यात महत्वाचे आज दिवसभर झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारपासून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. 15 मार्चला अमरावती आणि नागपूर, १७ मार्च औरंगाबाद आणि नाशिक तर १८ मार्चला पुणे आणि नवी मुंबईमध्ये या दोन्ही नेत्यांचे मेळावे सुरू होणार आहे.

१६ तारीखला दिल्लीला चर्चा होईल तेव्हा राज्यातील नावावर चर्चा होईल.आज वर्षावर नियोजनाच्या दृष्टीने व्यसवस्थापन समितीच्या बैठका झाल्या. शिवसेना-भाजपाचे उद्यापासून मेळावे सुरू होत आहेत ज्याला मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. – सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -